आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकुचितता सोडून महाराष्ट्र घडवणे, हेच अत्र्यांचे खरे स्मरण- कानडे, ‘दिव्य मराठी’च्या विद्या गावंडे यांचा गाैरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘आचार्य अत्रे यांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत यशाचे  शिखर गाठले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते अग्रेसर होते.  आपल्या राज्याचे नाव ‘महाराष्ट्र’ असेच असावे, हा अत्रे यांच्या  कणखर भूमिकेचा परिपाक होता. या पार्श्वभूमीवर अत्रे यांचे खरे स्मरण संकुचित वृत्ती सोडून सहकार्य आणि मेहनतीने महाराष्ट्र घडवण्याने होईल,’ असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती  विद्यासागर कानडे यांनी रविवारी केले.   
 
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे आणि  विनोद विद्यापीठ यांच्या संयुक्त  विद्यमाने  आयोजित ‘हास्य-विनोद-आनंद महोत्सवा’चा समारोप आणि  पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत  होते. या वेळी  ‘दिव्य मराठी’च्या औरंगाबाद  येथील  बातमीदार  विद्या गावंडे यांना  पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. अडीच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देविदास फुलारी, अनिल दीक्षित, सु. ल. खुटवड, मधुकर भावे, अालोक निरंतर, सिद्धार्थ काणे, शरद भुताडिया,  सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर, नयना आपटे, राहुल लिमये, विभावरी दिवेकर, नरेश म्हस्के, मेजर सुभाष गावंड आणि भानू काळे यांनाही अत्रे यांच्या नावाने विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेत्री नयना आपटे यांनी अत्रे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.
 
बातम्या आणखी आहेत...