आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण मागणारे लग्नाच्या वेळी आरक्षण लपवतात, अजित पवार यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आरक्षण मागणाऱ्यांवर शनिवारी बारामतीत टीका केली.
पवार म्हणाले, अनेकांना शैक्षणिक आणि इतर सुविधा घेताना आरक्षण हवे असते. मात्र, अनेकांना लग्नाची वेळ आली की, आम्ही कसे श्रेष्ठ आणि वरच्या दर्जाचे आहोत, हे दाखवण्यासाठी खटाटोप करावा लागतो. माझ्यासह सर्वांनाच आरक्षण पाहिजे, पण लग्नाची वेळ आली की सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही वरच्या दर्जाचे… लय लय वरचे, असे सांगायलाही विसरत नाहीत, असा टोलाही त्यांनी आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना लगावला. याबाबत मी खूप ऐकले आहे. जाऊ दे आता काही जास्त बोलत नाही. मागं काय काय बोलून माझं लय वंगाळ झालंय, असे म्हणत पवार यांनी या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले. दरम्यान, याआधीही अजित पवार यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकारात्मक असून त्यांनी राज्यात निघणाऱ्या मराठा मोर्चाचे समर्थन केले आहे. मात्र, अजित पवार यांच्या भूमिकेमुळे त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...