आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जानकर म्हणाले, खंडेरायाची शपथ शिवी दिली नाही, तरी दुखावले असाल तर खेद व्यक्त करतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भगवान गडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेमध्ये महादेव जानकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला आहे. पण जानकर यांनी मीडियाकडे प्रसिद्दीपत्रक देत त्यामाध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले जानकर..

खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो, पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा. गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते. सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुषित झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी जानकरांविराेधात अांदाेलन करून संताप व्यक्त केला. या निमित्ताने आंदोलनासाठी हाती कोणताच मुद्दा नसलेल्या राष्ट्रवादीला आयता मुद्दा मिळाला असून जोरदार प्रत्युत्तर देण्याचीही तयारी त्यांनी केली.


मराठ्यांच्या मूकमोर्चांच्या विरोधात ‘ओबीसीं’चे संघटन करण्याचे प्रयत्न राज्यात सुरू आहेत. अशा स्थितीत जानकरांनी अजित पवारांवर वैयक्तिक टीका केल्याने ‘मराठा विरुद्ध धनगर’ असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा एकीकरणाला ‘राष्ट्रवादी’च्या बाजूने वळवण्याची आयती संधी यामुळे पवारांपुढे चालून आली आहे. भरीस भर म्हणून राज्याच्या मंत्र्याने बारामतीच्या वाटोळ्याची भाषा करून मंत्रिपदाच्या कर्तव्याचा भंग केल्याचीही भावना निर्माण झाली आहे. यामुळे जानकरांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्याचीही तयारी काही मराठा वकिलांनी सुरू केली आहे. अजित पवारांच्या भाषेमुळे अनेकदा ‘बॅकफूट’वर जावे लागणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ला जानकरांनी आक्रमक होण्याची संधी दिली आहे. जानकरांच्या वक्तव्याविरोधात ‘सोशल मिडिया’तून मराठा तरुण संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. जानकरांनी राजकीय भूमिकेतून पवारांवर टीका केली असली तरी त्याला ‘मराठा विरुद्ध धनगर’ असा रंग येऊ लागला आहे. यामुळे पवारांना अपेक्षित मराठा एकीकरणास गती मिळण्याची शक्यता आहे. भाजप सरकारमधले तीन मंत्री आणि अनेक आमदारांच्या उपस्थितीत फडणवीसांच्या कॅबिनेट मंत्र्यांने अजित पवार आणि बारामतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ही बाब फडणवीसांना गोत्यात आणणारी ठरु शकते. जानकरांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी दिलेली ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ ही प्रतिक्रीया सूचक मानली जात आहे.

राजीनामा घ्या, माफी मागा; राष्ट्रवादीची मागणी
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक बुधवारी झाली. यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जानकरांचा त्वरित राजीनामा घ्यावा आणि जानकरांनी जाहीर माफी मागावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. “जानकर जेव्हा पुण्यात येतील त्यावेळी त्यांचे ‘स्वागत’ कसे करायचे याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. जानकरांनी जाहीरपणे यावे; मग पुण्यातली राष्ट्रवादी आणि शरद पवार-अजित पवारांचे अनुयायी काय आहेत, हे त्यांना दाखवून देऊ, असे आव्हान पुणे राष्ट्रवादीने दिले आहे.

‘लाळघोट्या’मुळे मराठ्यांमध्ये संताप
^आमचेनेतेशरद पवार निश्चितपणे पुरोगामी आहेत. ‘मराठा नेता’ हीदेखील त्यांची मान्यता आहेच. त्यामुळे जानकरांच्या वक्तव्याबद्दल मराठ्यांमध्ये संताप आहे. त्यांच्या पक्षाचे मराठा आमदार राहुल कुल यांना हे मत मत मान्य नसेल तर त्यांनी आमदारकी सोडावी.’ अंकुशकाकडे, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस

जानकरांना बारामती विसरणार नाही
^धनगर समाजात गोपीनाथ मुंडेंनी ‘पवारविरोध’ रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याला अशा घटनांमुळे खतपाणी मिळते. जानकरांची भाषा अयोग्यच. बारामतीचे वाटोळे करण्याची शापवजा धमकी बारामतीची जनता कदापि विसरणार नाही.” राजेंद्रकोंढरे, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ
त्यांना बडतर्फच करा
^‘एमएलसी’म्हणजे मुख्यमंत्र्यांचा लाॅयल चमचा, असा उल्लेख करत जानकर यांनी विधान परिषद, मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्याचा अपमान केला आहे. त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करू. नेतृत्व टिकवण्यासाठी जानकरांचा हा प्रयत्न असून भगवानगडाच्या पायथ्याला अशी भाषा मंत्र्याला शोभनीय नाही. -धनंजय मुंडे, विराेधी पक्षनेते, विधान परिषद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या निषेधार्थ अांदाेलन केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बारामतीतील हल्ल्याचे आणि जानकरांविरोधी आंदोलनाचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...