आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बारामतीत बोटीवर सेल्फी घेताना 10 डॉक्टर बुडाले; 4 ठार, पोहता येत असल्याने सहा बचावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती  - उजनी धरणात जलविहार करत असताना रविवारी बाेट उलटल्याने चार डाॅक्टरांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना इंदापूर तालुक्यातील अजाेती गावात घडली.
 
माळशिरस तालुक्यातील काही डॉक्टर सुटी एन्जाॅय करण्यासाठी उजनी जलाशयात गेले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही डाॅक्टर बाेटीतून जलविहार करत हाेते, मात्र किनाऱ्यापासून दीड किलाेमीटर अात त्यांची बाेट उलटली. यात  डॉ. महेश मांजरेकर (भूलतज्ज्ञ, अकलूज), डॉ. महेश लवटे,  डॉ. चंद्रकांत उराडे, डाॅ. अण्णा शिंदे (तिघे रा. नातेपुते, जि. सोलापूर) या चाैघांचा बुडून मृत्यू झाला.  इतर सहा जणांना पोहोता येत असल्याने ते पोहोत किनाऱ्यापर्यंत पोहोचले.
 
प्राण वाचलेले सहा डॉक्टर...
१)डॉ.  प्रवीण श्रीरंग पाटील, माळशिरस,
२)डॉ. दत्तात्रय भगवान सर्चे, माळशिरस,
३)डॉ. अतुल विनोदकुमार दोशी, अकलूज 
४)डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडेकर, अकलूज
५)डॉ. समीर अशोक दोशी, अकलूज 
६) डॉ. दिलीप तुळशीराम वाघमोडे,  माळशिरस..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...