आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल गेल \'ब्ल्यू व्हेल\'चा सोलापूरला विळखा; घराबाहेर गेलेला 9 वीचा मुलगा सापडला भिगवणला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ सोलापूर- बुधवारी सकाळी सोलापुरातील एक १४ वर्षीय मुलगा घराबाहेर पडला. एसटीत बसून भिगवणपर्यंत पोहोचला. दरम्यान, तो 'ब्ल्यू व्हेल गेम'मध्ये फसल्याचे पालकांच्या ध्यानी आले. धावाधाव सुरू झाली अन् पोलिसांच्या मदतीने त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात यश आले. याच गेमच्या नादात एका मुलाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला होता. दिवसेंदिवस या गेमचे मुलांमध्ये आकर्षण वाढत असताना बुधवारी साेलापुरातील एक मुलगा या जाळ्यात फसल्याचे समोर आले. 
 
हा मुलगा जुळे सोलापूर येथील एका शाळेत नववीत शिकत आहे. आई शिक्षिका तर वडील खासगी क्षेत्रात काम करतात. आठवीनंतर क्रिकेट अकॅडमीनिमित्त त्याला जुळे सोलापुरातीलच दुसऱ्या शाळेत दाखल करण्यात आले. तो नवीन शाळेत रमला नाही. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तो अस्वस्थ होता, रात्री झोपत नव्हता, चिडचीड करत होता. वडिलांनी त्याला झोप येण्यासाठी आयुर्वेदिक तेलाने डोक्याची मसाज केली.
 
बुधवारी सकाळी 6 वाजता तो क्रिकेट अकॅडमीचे तीन हजार रुपये शुल्क घेऊन बाहेर पडला. एक तासाने मुलाने लिहिलेली एक चिठ्ठी आई-वडिलांच्या हाती सापडली. त्या चिट्टीत त्यांनी शाळा बदलल्याचा उल्लेख करून, मी घर सोडून जात आहे, माझा शोध घेऊ नका, अन्यथा मी काहीही करून घेईन, असे लिहिल्याचे दिसले. घरात रडारड सुरू झाली. शेजारचे जमले. पोलिसांच्या मदतीने त्याला भिगवण येथून सुखरूप ताब्यात घेण्यात आले. रात्री झोपणे, मोबाइलवर व्यग्र राहणे, यावरून मुलाने ब्ल्यू व्हेलच्या मायाजालमध्ये अडकून असा प्रकार केल्याचा अंदाज पालकांनी 'दिव्य मराठी'कडे व्यक्त केला.

असा लागला मुलाचा शोध 
पालकांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे ग्रामीण विभागातील पाेलिस कर्मचारी घरी गेले. त्यांनी मुलाचा मोबाइल नंबर घेऊन पोलिसांच्या मदतीने ट्रेस केला, तेव्हा टेंभुर्णी रोडपर्यंत रेंज दिसली. त्यांनी एसटी स्टॅँड गाठून त्या मार्गाने सकाळी ते साडेसातपर्यंत कुठल्या गाड्या गेल्या त्याची चौकशी केली. त्या गाड्यांतील चालक आणि वाहकांशी संपर्क सुरू केली. एका एसटीतील वाहकाने सांगितलेल्या वर्णनानुसार मुलगा एसटीत असल्याचे संागितले. 

मग त्या शेजारच्या पोलिसाने भिगवण पोलिस ठाण्यात संपर्क केला आणि एसटी नंबर सांगून त्या मुलाला ताब्यात घेण्याची विनंती केली. तसेच त्या एसटी वाहकाला भिगवण बस थांबाजवळ थांबवण्यास सांगितले. भिगवण पोलिसांनी लगेच बस थांबा गाठला आणि एसटीमधील त्या मुलास गोड बोलून आपल्या ताब्यात ठेवले. तेवढ्यात सोलापूरहूून पालक आणि शेजारील पोलिसांनी कारने भिगवण ठाणे गाठले. मुलाला पाहताच पालकांना अश्रू आवरणे कठीण झाले. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... 'ब्ल्यू व्हेल'ची लेव्हल पूर्ण करण्यासाठी 14 वर्षीय मुलाची सहाव्या मजल्यावरून उडी
बातम्या आणखी आहेत...