आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायंकाळ होताच हा पुस्‍तकांचा बाजार बदलतो रेडलाइट एरियामध्‍ये; बिल गेट्स यांनी दिली भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला 'अप्पा बळवंत चौक' येथेच आहे. या चौकात दिवसभर पुस्‍तके खरेदी करणाऱ्यांची गर्दी होते तर सूर्य मावळतीकडे जाताना या परिसरात वेश्‍या बाजार गजबजतो. सेक्स वर्कर्सच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी झटणाऱ्या 'सहेली' या संस्‍थेने या ठिकाणी 'सुरक्षा' नावाने एक सर्वे केला. त्‍यात या दलदलित अडकलेल्‍या मुली आणि महिलांचे विदारक वास्‍तव समोर आले.
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा रेड लाइड एरिया
'सहेली' ने बुधवारपेठेमधील वेश्‍यांचे आरोग्‍य, त्‍यांचे कौटुंबिक जीवन, चालीरीती यांचे सर्वेक्षण केले. विशेष म्‍हणजे हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा रेड लाइड एरिया आहे. सध्‍या या ठिकाणी 440 कोठे आहेत. ज्‍यामध्‍ये 5 हजारांपेक्षा अधिक सेक्‍स वर्कर्स राहतात.
सर्वेचा उद्देश
सहेली संस्थेच्‍या संचालिका तेजस्विनी सेवेकारी यांनी सांगितले, ''या सर्वेच्‍या माध्‍यमातून सेक्स वर्कर्संना त्‍यांच्‍या आरोग्‍याविषयी जागरुक करणे हाच या सर्वेचा मुख्‍य उद्देश आहे. देह विक्री करणाऱ्या महिलांचा मासिक धर्म, त्‍यांची प्रजनन क्षमता आणि गुप्‍तरोगासंबंधी सर्व छोट्या मोठ्या गोष्‍टींची माहिती जमा केली आहे. त्‍यांना गर्भावस्था, मातृ देखभाल, स्तनपान, प्रसूती, सुरक्षित गर्भपात, कुटुंब नियोजन यासाठी काय करावे यांची तपशीलवार माहितीही दिली आहे'', असे त्‍यांनी सांगितले.
1 हजार सेक्स वर्कर्सचा सर्वे
या सर्वेसाठी संस्‍थेने सामाजिक कार्यकर्ते, आरोग्‍य तज्‍ज्ञ, ट्रेंड काउंसलर, एक अकाउंटंट आणि एक प्रोजेक्ट डायरेक्टर या सर्वांमिळून एक टीम तयार केली होती. विशेष म्‍हणजे यामध्‍ये सहभागी अकाउंटंट एका सेक्स वर्करची मुलगी आहे. यातून वस्‍तुनिष्‍ठ माहिती मिळावी, यासाठी स्‍थानिक नागरिक, पोलिस यांचीही मदत घेतली गेली. सर्वेच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात ही टीम एक हजार सेक्‍स वर्कर्सपर्यंत पोहोचली. जून 2015 मध्‍ये या सर्वेला सुरुवात झाली.
अत्‍यंत खडतर आहे जीवन
सर्वेच्‍या नुसार, रेडलाइट एरियामध्‍ये राहणाऱ्या महिलांचे जीवन अत्‍यंत खडतर आहे. गरमी आणि प्रचंड दुर्गंधी असलेल्‍या 8x6 च्‍या छोट्या - छोट्या खोलीमध्‍ये त्‍या राह‍तात. या बदनाम गल्‍लीमध्‍ये जाण्‍यासाठी केवळ 5 फूट रुंद रस्‍ता आहे. या ठिकाणी लाकडाचे जुन्‍या पद्धतीने बांधकाम केलेली काही घरे आहेत. सायंकाळ होताच देहविक्री करणाऱ्या मिहला भडक मेकअप करून रस्त्यावर, दारात, पायऱ्यांवर उभ्‍या असतात.

बिल गेट्स यांनी दिली होती भेट
या बदनाम गल्‍ल्‍यांमध्‍ये वर्ष 2008 मध्‍ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष बिल गेट्ससुद्धा आले होते. त्‍यांनी या ठिकाणी तब्‍बल एक तास घालवला आणि देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत चर्चाही केली. त्‍यांना एचआयव्‍ही एड्सबद्दल सांगितले. एवढेच नाही तर त्‍यांच्‍या मुलांच्‍या भविष्‍यासाठी 200 मिलियन अमेरिकी डॉलरची देणगीही दिली.
पुढील स्‍लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...