आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी लठ्ठपणाचे उदाहरण, राज्यात जनजागृती करू; मुख्यमंत्री फडणवीस यांची घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मी बालपणापासून लठ्ठपणाचे उत्तम उदाहरण अाहे. वजन कमी-जास्त करण्याचे फायदे-ताेटे मला नीट माहिती आहेत. वजन वाढत असल्याचे बालपणी सांगणारे कुणी नव्हते. अाजच्या काळात मुलांना अन्य संस्कारांसोबतच शरीर याेग्य रीतीने घडवण्याचा महत्त्वाचा संस्कार देणे गरजेचे अाहे. त्यामुळेच रोगाची जननी असलेल्या लठ्ठपणाविरोधात राज्यभर लवकरच मोहीम सुरू केली जाणार असल्याची घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.


पुण्यातील राेटरी क्लब अाॅफ काेरेगाव पार्क अाणि जेटी फाउंडेशन यांच्या वतीने “बालपणी जडणाऱ्या स्थूलपणाविराेधातील चळवळी’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद््घाटन झाले. त्या वेळी ते बाेलत हाेते. या वेळी खासदार अनिल शिराेळे, राेटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय गाडगीळ, डाॅ. ज्याेती ताेडकर, संदेश गुप्ता, नवनीत गाला उपस्थित हाेते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जीवन पद्धतीत बदल करण्याकरिता माेठे परिवर्तन अावश्यक अाहे. लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत असल्याने भारताची भविष्यातील पिढी त्यात गुरफटत आहे. नकळतरीत्या अामच्या पिढी सक्षमतेकडून अक्षमतेकडे वाटचाल करत असून अनेक अाजारांना बळी पडत अाहे. जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे लठ्ठपणा राेगाची जननी बनला आहे. त्याविराेधात अाराेग्य, शिक्षण, वैद्यकीय अशा विविध विभागांत समन्वय साधून राज्यभर माेहीम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...