आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संघर्ष’ला ‘संवाद यात्रे’ने प्रत्त्युत्तर; फडणवीस म्हणाले- ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’वाले निर्लज्ज, कोडगे\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच पंधरा वर्षांच्या कारभारामुळे आपली दुरवस्था झाली हे शेतकऱ्यांना चांगले समजते. त्यामुळेच ‘त्यांच्या’ (विराेधकांच्या) संघर्ष यात्रेला शेतकऱ्यांचे समर्थन मिळत नाही. शेतकऱ्यांना संवादाची अपेक्षा आहे. भाजपच्या आमदार, खासदार, नेते, मंत्र्यांनी पंधरा दिवस घर सोडून शेतकऱ्यांशी संवाद साधावा,’ असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला. त्यांची संघर्ष यात्रा तर आपली संवाद यात्रा, असेही ते म्हणाले.
 
पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचा समारोप गुरुवारी फडणवीस यांच्या भाषणाने झाला. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील या वेळी उपस्थित होते.  
 
मुख्यमंत्री म्हणाले, ‘भाजपच्या पाच लाख कार्यकर्त्यांनी ५० लाख घरांशी संवाद साधला पाहिजे. सभा घेण्याची गरज नाही. शिवारात जा. गावात जा. शेतकऱ्यांच्या शेतावर जा. बैठका घ्या. लोकांशी बोला. सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा. संवाद यात्रेच्या माध्यमातून ‘हर हाथ को काम, हर खेत को पानी,’ ही योजना पंचवीस लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचवा,’ असे अावाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ‘राज्यातले ८२ टक्के कोरडवाहू शेतकरी निव्वळ पावसावर अवलंबून आहेत. या शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन आवश्यक आहे. भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने शेतीतली गुंतवणूक वाढवल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कृषी विकासाचा सातत्याने उणे असणारा दर आता साडेबारा टक्क्यांवर गेला आहे,’ असे फडणवीस म्हणाले. यंदा राज्यातले ४६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. गेल्या २० वर्षांतील हा उच्चांक असल्याचा दावाही त्यांनी केला.  
 
‘विराेधकांनी शेतकऱ्यांना नागवले’
‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात १३ लाख टन तूर उत्पादन झाले. तेव्हा त्या सरकारने फक्त २० हजार टन खरेदी केली. या तुरीचे पैसे नऊ महिन्यांनी दिले. यंदा राज्यात २० लाख टन तूर उत्पादन झाले. यातली २५ टक्क्यांहून अधिक तूर सरकार खरेदी करत आहे. संधी होती तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना नागवण्याचे काम केले. मात्र अाम्ही २२ एप्रिलपर्यंतची सर्व तूर खरेदी करू,’ असे अाश्वासन त्यांनी दिले.
 
महाराष्ट्रदिनी सरकारला दहा किलाे तूर विराेधक भेट देणार
कराड- ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी विराेधी पक्षांनी संघर्ष सुरू केलेला अाहे, ताे सुरूच राहील. महाराष्ट्र दिनी विराेधी पक्षांचे अामदार तालुक्यात झेंडावंदन केल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना १० किलाे तूर भेट देऊन सरकारचा निषेध व्यक्त करणार अाहेत. तर दाेन मे रेाजी राज्यपालांची भेट घेऊन कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बाेलावण्याची मागणी करणार अाहेत,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
विराेधकांची संघर्ष यात्रा गुरुवारी कराडमध्ये दाखल झाली. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केल्यानंतर पुढील अांदाेलनाची दिशा स्पष्ट करण्यात अाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अामदार अबू अाझमी अादींची उपस्थिती हाेती.
 
अजित पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशाला तूर अायात करावी लागत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणावर तूर उत्पादनाचे अावाहन केले हाेेते. त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतले. त्यामुळे अाता तुरीच्या खरेदीचा प्रश्न माेदींनीच साेडावावा,’ अशी मागणीही त्यांनी केली.
 
तटकरे म्हणाले, ‘अात्महत्यांचे लाेण अाता पश्चिम महाराष्ट्रातही अाले अाहे. त्यामुळे कर्जमाफी करण्याची गरज अाहे. शरद पवार कृषीमंत्री असताना शेतमालाला अाधारभूत किंमत वाढवून देण्यात अाली हाेती. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली त्याच महाराष्ट्र सरकारला उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीचा अभ्यास करण्याची वेळ अाली ही लाजीरवाणी बाब अाहे.’
 
‘विसंवादी सरकारची संवाद यात्रा’
मुंबई-| शेतकऱ्यांचा वाढता असंतोष, संघर्ष यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद या पार्श्वभूमीवर पायाखालची वाळू सरकल्यानेच विसंवादी सरकारने मगरीचे अश्रू ढाळण्याकरिता ‘संवाद यात्रे’ची घोषणा केली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी केली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा...‘काँग्रेस-राष्ट्रवादी’वाले निर्लज्ज, कोडगे; फडणवीस यांची टीका...
बातम्या आणखी आहेत...