आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरपुत्राला पोगरवाडीत अखेरचा सलाम, शहीद कर्नल संतोष महाडिक अनंतात विलिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली वाहताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर... - Divya Marathi
शहीद कर्नल संतोष महाडिक यांना श्रद्धांजली वाहताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर...
सातारा- जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा येथील जंगलात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्यावर आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी संतोष यांचे पार्थिव मूळगाव पोगरवाडीत तासभर दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल संतोष यांच्या 6 वर्षाच्या मुलाने आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. आपल्या लाडक्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.
साता-याचा सुपुत्र कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव सकाळी 11च्या सुमारास मूळगावी पोगरवाडीत आणण्यात आले. त्याआधी आरेदरे येथे संतोष यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता यावे म्हणून ठेवण्यात आले होते. तेथे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संतोष यांना मानवंदना देत अखेरचा सलाम ठोकला. यावेळी पर्रीकर यांनी संतोष यांच्या आई व पत्नीशी हितगूज केले व सात्वंन केले. संतोष यांचा देशाला अभिमान आहे असेही पर्रीकरांनी सांगितले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह साता-याचे खासदार उदयनराजे भोसले, मंत्री एकनाथ शिंदे, विजय शिवतारे यांच्यासह अनेक मान्यवर पोगरवाडीत दाखल झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष यांच्या पार्थिवाचे काल रात्रीच पुण्यात दर्शन घेतले. तसेच संतोष यांच्या पत्नी व मुलांचे सांत्वन केले. संतोष यांच्या कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार उचलेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गावक-यांची गर्दी- आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पोगरवाडी ग्रामस्थ व परिसरातील गावक-यांनी एकच गर्दी केली होती. गावक-यांनी संतोष यांचे पार्थिव ज्या रस्त्याने येणार आहे त्या रस्त्यावर फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. पोगरवाडीत एकूनच दु:खाची किनार असतानाही शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्याबाबत अभिमानच असल्याचे जागोजागी दिसून येत आहे. पोगरवाडीतील अनेक लोक भारतीय लष्करात आहेत. 500 लोकवस्तीच्या या गावातून सुमारे 35 ते 40 जण लष्करात आहेत किंवा तेथून निवृत्त झाले आहेत. सातारा परिसरातील निवृत्त जवानांनी महाडिक यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती.
पुढे छायाचित्रातून पाहा, संतोष यांना कसा दिला अखेरचा निरोप...