आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरणपटूच्या डोक्यात आईनेच घातला पाटा, नंतर केला अात्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अांतरराष्ट्रीय जलतरणपट्टू असलेला मुलगा अभ्यासात लक्ष देत नसल्याने संतापलेल्या अाईनेच मुलाच्या डाेक्यात दगडी पाटा टाकून खुनाचा प्रयत्न केला. नंतर मुलाच्या अाईनेही अात्महत्येचा प्रयत्न केला. दोघेही अत्यवस्थ आहेत. ही घटना मंगळवारी  गुरुवार पेठेत घडली. 

हर्षवर्धन अजित चव्हाणची  (वय-११) अाई अंजलीवर वडील अजित यांच्या फिर्यादीवरून खडक पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला अाहे.अजित चव्हाण हे इस्टेट एजंट असून त्यांची पत्नी उच्चशिक्षित अाहे. हर्षवर्धन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहावीत शिकत होता. तो पाेहण्यात पारंगत होता. त्याने  २०१५ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील  जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला. तर २०१६ मध्ये रशियात झालेल्या अांतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ताे निवडला गेला हाेता. अभ्यास साेडून हर्षवर्धन जलतरण स्पर्धेच्या तयारीस लागल्याने  त्याची अाई रागात हाेती.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...