आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर क्राइम: बनावट वेबसाइट नाेंदणी करणारे रॅकेट पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अायडीयाबीझ नावाची बनावट डाेमेन रजिस्ट्रेशनची कंपनी सुरु करुन त्याला नायजेरियतील खाेटा पत्ता देऊन पंजाबमधील दाेन भामटयांनी कंपनी सुरु केली. पब्लिक डाेमेन रजिस्टर या अधिकृत डाेमेन पुरवठा करणाऱ्या कंपनीचे रीसेलर म्हणुन ते २००८  पासून काम करीत अाहेत. तसेच नायजेरिया मध्ये डाेमेनकिंग या नावाने हानु इंटरनॅशनल कार्पोरेशन प्रा.लि या नावाने बनावट कंपनी उघडून अाजपर्यंत ४०  हजार बनावट डाेमेन रजिस्टर केल्याची बाब पुणे गुन्हे शाखेच्या सायबर सेलने उघडकीस अाणल्याची माहिती पाेलीस उपअायुक्त दीपक साकाेरे यांनी िदली अाहे. 

याप्रकरणी हरगुरुनाज करमसिंग विजयसिंग (वय-२० ) व परभनाज करमसिंग विजयसिंग (२५ , दाेघे रा.जालंधर,पंजाब) या अाराेपींना त्यांचे काॅलसेंटरवर छापा टाकुन सायबर सेलचे महिला पाेलीस िनरीक्षक राधिका फडके, स.पाे.नि. सचिन गवते व पथकाने अटक 
केली अाहे. पुण्यातील मुंढवा येथील अजयकुमार ठाकुर यांनी याबाबत पाेलीसांकडे िफर्याद िदली अाहे. ठाकुर यांची ई.जी.कांटावाला प्रा.लि ही कंपनी चीन मधील झाेंगशान कॅमरे इलेक्ट्राॅनिक्स प्रा.लि या कंपनीकडून दहा टक्के अॅडव्हान्स पैसे देऊन कच्चा माल अायात करुन वजनकाटे बनवून संपुर्ण भारतात विक्रीसाठी पाठवित असते. त्यासाठी त्यांनी चीन मधील कंपनीच्या संपर्कात राहून त्यांनी कच्च्या मालाची अाॅर्डर पाठवली.  त्याचे दहा टक्के प्रमाणे सात हजार यूएसडी भरले हाेते. तरीही त्यांच्याकडे परत ३०  टक्के अागाऊ रक्कम मागण्यात अाल्याने त्यांना संशय अाला. त्यानंतर चाैकशी केली असता, बनावट ईमेल द्वारे संपर्क करुन पैसे हडपल्याची बाब उघड झाली.  

हाँगकाँगच्या वॉलेटचा वापर फसवणुकीसाठी
अाराेपींनी हाँगकाँग बेस वाॅलेटचा वापर करुन दाेन ईमेल अायडीद्वारे अाॅनलाइन पैसे स्वीकारले अाहेत. बनावट डाेमेनचा वापर गुन्हेगारांनी करुन इन्शुरन्स फ्राॅड, जाॅब फ्राॅड, लाॅटरी फ्राॅड, टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स फ्राॅड, सीडस फ्राॅड, अाॅनलाइन बीझनेस फ्राॅड, मल्टीलेव्हल मार्केटिंग फ्राॅड अादी सायबर गुन्हे करण्यासाठी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले अाहे. . गुन्हेगारांनी अत्यंत धूर्तपणे लोकांच्या मन:स्थितीचा फायदा उचलत फसवणूक केल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली
बातम्या आणखी आहेत...