आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयितांची माहिती देण्याचे सीबीआयचे नागरिकांना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे केंद्रीय गुन्हे अन्वेेष्ण विभागाच्या विशेष गुन्हे शाखेने शुक्रवारी जारी केली आहेत. दोन्ही संशयितांबाबत नागरिकांना काही माहिती समजल्यास किंवा आढळल्यास संबंधितांनी ही माहिती सीबीअायला ०२२- २७५७६८०४, ०२० -२५८२४३५० या क्रमांकावर द्यावी,असे अावाहन सीबीअायचे अप्पर पाेलिस अधीक्षक एस.अार.सिंग यांनी केले अाहे.
डाॅ.दाभाेलकर यांची २० ऑगस्ट २०१३ राेजी दोन अज्ञातांनी हत्या केली होती. हल्लेखाेरांविराेधात डेक्कन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांना दोन वर्ष उलटूनही मारेकरी शोधण्यात अपयश आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार सीबीआयने शुक्रवारी संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्र जारी केली. मारेकरी निदर्शनास आल्यास एस.अार.सिंग यांना ८४२५८३२९५५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.