आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूम्रवर्ण रथातून निघणार मिरवणूक, लक्ष आकर्षून घेणार दगडूशेठ हलवाई गणपती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गणेश विसर्जन मिरवणुकीत आपल्या वेगळेपणाने भाविकांचे लक्ष आकर्षून घेणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या  गणेश सांगतेची मिरवणूक वैभवशाली अशा ‘धूम्रवर्ण रथा’तून निघणार आहे. अत्यंत आकर्षक नक्षीकामाने सजलेला हा धूम्रवर्ण रथ २२ फूट उंच असेल. पाच सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. रात्री उशिरा निघणारी मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी दरवर्षी होते.   
 
यंदा धूम्रवर्ण रथातून निघणारी मिरवणूकही भाविकांच्या नेत्रांचे पांग फेडणारी असेल. रथाला आठ खांब असून चार भव्य कमानींनी रथ तोलून धरला आहे. १५ बाय १५ असा रथाचा आकार आहे. नक्षीकामाने सजलेले पाच कळस या रथाचे वैभव वाढवतील. रथावर ३६ झुंबरांची सजावट करण्यात आली आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांच्या  संकल्पनेतून धूम्रवर्ण रथ साकारला आहे. सुनील प्रजापती (रंगकाम), वायकर बंधू (प्रकाश योजना) यांचा सहभाग या सजावटीत असल्याचे अध्यक्ष गोडसे यांनी सांगितले.

अग्रभागी पर्यावरण रथ  
यंदा मिरवणुकीच्या  अग्रभागी पर्यावरण रथ असेल. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक त्यावर असतील. जनजागृतीचा हा प्रयत्न आहे. विनायक देवळणकर यांचा नगारा, दरबार बँड, प्रभात बँड, स्वरूपवर्धिनीचे पथकही सोबत असेल. 
- अशोक गोडसे, अध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...