आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाजीकाका गाडगीळ करंडक स्पर्धेत हिंदी, इंग्रजीला एन्ट्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पीएनजी ज्वेलर्सतर्फे दाजीकाका गाडगीळ स्मृती करंडक या एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा असून राज्याच्या वेगवेगळ्या भागातील स्पर्धक यामध्ये भाग घेऊ शकतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच्या प्रवेशिका पीएनजी ज्वेलर्सच्या पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद आणि गोवा येथील सर्व दालनांमध्ये ५ ऑगस्ट २०१७ पासून उपलब्ध आहेत. यंदापासून ही स्पर्धा मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेतील एकांकिकांसाठीही खुली असणार आहे. 
 
पीएनजी ज्वेलर्स, पायनापल एक्सप्रेेशन्स स्टुडिओ आणि मैत्री प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची संकल्पना चित्रपट निर्माते अजय नाईक यांची आहे. अभिनेते प्रशांत दामले हे या उपक्रमासाठी चिफ मेंटर (मार्गदर्शक) असणार आहेत, अशी माहिती पीएनजीचे भागीदार सौरभ गाडगीळ यांनी दिली.    
 
प्राथमिक फेरीला ११ सप्टेंबरपासून सुरुवात
प्राथमिक फेरी ११ ते २१ सप्टेंबरदरम्यान  पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद आणि गोवा या ठिकाणी  होणार आहे, तर अंतिम फेरी २५ व २६ सप्टेंबरदरम्यान होणार आहे.  परीक्षकांमध्ये एक लेखक, एक दिग्दर्शक, एक कलाकार (महिला व पुरुष), एक निर्माता, एक कला दिग्दर्शक व एक प्रकाश संयोजक यांचा समावेश असणार आहे. प्रथम क्रमांकास एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ७५००० रुपये आणि तृतीय क्रमांकास ५१००० रुपये व २ उत्तेजनार्थ संघांना प्रत्येकी १०,००० रुपये देण्यात येतील. अंतिम विजेत्याला दाजीकाका गाडगीळ करंडक प्रदान करण्यात येणार आहे.    
 
एकांकिका अभिनयाची पहिली पायरी: दामले
उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रशांत दामले म्हणाले की, एकांकिका ही अभिनयाची पहिली पायरी असते. यामुळे कलाकाराचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीमध्ये फरक हा फक्त विषयाचा असतो. दाजीकाका गाडगीळ नाट्य करंडकमध्ये स्पर्धकांना त्यांच्यात काय नाही व काय आहे व त्यावर पुढे कशी सुधारणा करावी हे मी सांगणार आहे.
बातम्या आणखी आहेत...