आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पत्नी आणि दोन मुलींची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत:ही एका व्यक्तीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील कात्रज परिसरात रविवारी घडली. पत्नी स्वाती दीपक हांडे (३५), मुली तेजस हांडे (१६) आणि वैष्णवी हांडे ( १२) अशी मृतांची नावे आहेत.   
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील दत्तनगर भागात हांडे कुटुंबीय राहत होते. रविवारी सकाळी दूधवाल्याने हांडे यांच्या दारावरील घंटी वाजवली. मात्र, आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने याबाबत शेजाऱ्यांना   माहिती दिली. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करताच चौघांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले.  त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.    

कुणाबाबतही तक्रार नाही  
हांडे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘आम्ही चौघेही आयुष्य संपवत आहोत. आमची कुणाविषयी काहीही तक्रार नाही,’ असे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.  त्यामुळे हत्या करण्यामागील कारण काय, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.  हांडे हे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होते. मुलगी तेजस ही हुजूरपागा शाळेत दहावीत, तर वैष्णवी इयत्ता पाचवीत शिकत होती. हांडे यांच्या डोक्यावर कर्ज होते, अशी माहिती पुढे येत आहे. भारती विद्यापीठ पोलिस पुढील तपास करत आहेत.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...