पुणे - कुमार बिल्डरच्या पाैड फाटा येथील ४२ मजल्यांच्या मेगा सिटी प्रकल्पात सॅम्पल फ्लॅट पाहण्याकरिता अालेल्या एका महिलेचा १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. अनुश्री अशुताेष पांडे (वय ५०, रा. बाणेर, पुणे) असे मृत महिलेचे नाव अाहे.
अनुश्री पांडे या बाणेरमधील कपिला मल्हार साेसायटीत राहत हाेत्या. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्या पाैड फाटा येथील कुमार बिल्डरच्या प्रकल्पातील फ्लॅट पाहण्यासाठी गेल्या हाेत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास १७ व्या मजल्यावरील फ्लॅट पाहत असताना ताेल जाऊन त्या बिल्डिंगवरून खाली बांधकाम सुरू असलेल्या साहित्याच्या ढिगाऱ्यावर पडल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच काेथरुड पाेलिस घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता ससून रुग्णालयात पाठवला. याबाबत पुढील तपास काेथरुड पाेलिस करत अाहेत. सदर महिलेची अाेळख मात्र पटू शकली नव्हती.