आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांवर अभाविपचा रोष; उच्च शिक्षण संचालक मानेंवर कारवाईसाठी पुण्यात आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांचे तीन महिन्यांपूर्वी जाहीर झालेले निलंबन अद्याप प्रत्यक्षात आले नाही आणि त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा निषेध म्हणून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी  गुरुवारी माने यांच्या  येथील  कार्यालयाची  तोडफोड केली. माने यांची गैरकृत्ये पाठीशी घालणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुण्यात येऊ देणार नाही, असा इशाराही अभाविपने दिला आहे.  माने यांना निलंबित न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देतानाच अभाविपने मुख्यमंत्र्यांविराेधातही घाेषणाबाजी केली.  
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०१२ मध्ये माने यांनी नियमांना बगल देऊन भरती प्रक्रिया राबवल्याचा आरोप सुमारे तीन महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर तावडे यांनी त्यांना निलंबित करण्यात येईल, असे सांगितले  होते. 
बातम्या आणखी आहेत...