आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी लंडनमध्ये पती सिंगापूरला, पुण्याच्या कोर्टात स्काइपवर झाला पहिला घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील एका काैंटुबिक न्यायालयाने स्काइपवर बयान घेत दाेन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या दांपत्याचा घटस्फोट मंजूर केला. पती सिंगापूर येथे नाेकरीला अाहे, पत्नी लंडनमध्ये. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासूनच ते वेगळे राहत हाेते. न्यायालयाने व्हिडीअाे कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घटस्फोट मंजूर केल्याची ही पहिलीच घटना अाहे. 
 
सिंगापूर मध्ये नाेकरी करत असलेला पती शनिवारी पुणे येथील काैटुबिक न्यायालयात हजर राहीला. मात्र, लंडनमध्ये काम करत असलेली त्याची पत्नी नोकरीमुळे काेर्टात उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे सीनियर डिव्हिजन जज व्हीएस मलकानपट्टे रेड्डी यांनी स्काइपवर तिची बाजू एेकली. पति-पत्नीचे वकील सुचित मुंदड़ा यांनी सांगितले की, या दांपत्याचे साेबतच शिक्षण झाले हाेते. मे २०१५ ला अमरावतीत लग्न झाले. त्यानंतर लगेच ते दाेघेही पुण्यात अाले हाेते. पुण्यात वेगवेगळ्या कंपण्यात ते दाेघेही नाेकरी करत हाेते. त्यांनी एक घरही खरेदी केले हाेते. मात्र, महिन्याभरानंतर पतीला सिंगापूरमध्ये नाेकरीची अाॅफर मिळाली अाणि पत्नीलाही लंडनची. पती लगेच सिंगापूरला निघून गेला. त्यामुळे महिलेला काही काळ पुण्यातच थांबावे लागले. मात्र, तीलाही लंडनला जावे वाटत हाेते. ३० जून,२०१५ नंतर दाेघही वेगळे झाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...