आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मेधा खोले यांच्‍यावर कारवाईसाठी मराठा समाजाचा पुण्‍यात मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकीण महिलेविरोधात पोलिसांत तक्रार देऊन वादग्रस्त ठरलेल्या हवामान विभागाच्या महासंचालक डॉ. मेधा खोले यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि त्यांना सेवेतून निलंबित करावे, या मागणीसाठी मराठा बहुजन समाजाच्या वतीने २५ सप्टेंबरला पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. 

घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात डॉ. खोले यांनी अपमानास्पद शब्दांचा वापर केला, पोलिसांवर गुन्हा नोंदवण्यासाठी दबाव आणला, आपल्या पदाचा दुरुपयोग केला, असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले. डॉ. खोले यांच्यावर याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही, विरोध होऊ लागताच त्यांनी तक्रार मागे घेतली. पण त्यांच्यावरही कारवाईची आमची मागणी आहे. त्यासाठी एल्गार मोर्चा सकाळी ११ वाजता लाल महालापासून निघून पोलिस आयुक्त कार्यालयावर नेला जाईल. वर्णवर्चस्वाच्या विरोधात लढणाऱ्या सर्वच संस्था, संघटना, कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...