आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यसंमेलनाचा खर्च सातारकरांना झेपेना, आता संमेलन ठाण्यात होण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- साहित्य काय आणि नाट्य काय, या संमेलनांनी खर्चाची कोट्यवधींची उड्डाणे घेतली आहेत. त्यामुळे भरभक्कम आर्थिक ताकद असणाऱ्यांनाच ही संमेलने झेपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आगामी नाट्यसंमेलन आर्थिक भार सोसणे शक्य नसल्याचे कारण देत सातारकरांनी संमेलनातून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे आता ठाण्यात हे संमेलन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाट्यसंमेलनासाठी सातारा, ठाणे, नागपूर, कोल्हापूरसह निमंत्रणे नाट्य परिषदेकडे आली होती. त्यापैकी सातारा येथे संमेलन घेण्याचे निश्चित झाले होते. पण स्थानिक आयोजकांनी त्यासाठी लागणारी कोट्यवधींची आर्थिक तरतूद करणे शक्य नाही, दुष्काळी वातावरण असल्याचे कारणे देत आयोजनातून माघार घेत असल्याचे नाट्य परिषदेला कळवले आहे. त्यामुळे आता ठाण्यात हे संमेलन आयोजित करण्याचा विचार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

संमेलन साधेपणाने
आता आगामी नाट्य संमेलन सातारा येथे होणार नाही. ठाण्यात ते घेता येईल का, याविषयी चर्चा सुरू आहे. संमेलन फेब्रुवारीमध्ये आहे. त्यामुळे पुरेसा अवधी आहे. वाढीव खर्चाला फाटा देऊन संमेलन साधेपणाने करण्यावर भर राहील.
मोहन जोशी, अध्यक्ष, नाट्य परिषद