आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर चॅटिंग महागात, आरोपीला ठाेकल्या बेड्या, मित्राच्या खाेलीवर चाेरी करणारा अाराेपी सापडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - निगडी येथे मित्रांच्या खोलीवर राहण्यास आलेल्या तरुणाने मित्रांचे लॅपटॉप, मोबाइल, बूट  आणि इतर सामान चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.  मात्र, त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी शक्कल लढवत एका महिलेला त्याला  फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने लगेच रिक्वेस्ट स्वीकारून महिलेशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. महिलेने त्याला पुणे स्टेशन येथे भेटण्यास बोलाविले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली.  

ताबान जायरखान पठाण (२१, रा. लाेणावळा, पुणे) असे अटक केलेल्या अाराेपीचे नाव अाहे. या वेळी त्याच्या ताब्यातून चोरलेला लॅपटाॅप, माेबाइल, चार्जर, बूट असा एक लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अाहे. निगडी पाेलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला हाेता. 

अाराेपी काेणत्याच मित्राचे फाेन घेत नव्हता. तसेच त्याने सर्वांचे नंबर ब्लाॅक केले हाेते. अाराेपीचे लाेकेशन व चाेरीस गेलेल्या माेबाइलचे लाेकेशन एक अाल्याने पाेलिसांचा त्याच्यावरील संशय  बळावला. त्यानंतर पोलिसांनी शक्कल लढवत त्याच्या फेसबुकची पाहणी केली असता त्याचा फाेटाे व इतर माहिती  मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी एका महिलेच्या खात्यावरून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याने ती लगेच स्वीकारून संबंधित महिलेशी चॅटिंग सुरू केले. महिलेने त्यास पुणे स्टेशन येथे भेटण्यास बाेलावले. ताे सदर ठिकाणी अाल्यानंतर पाेलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली.  अाराेपी पठाणची कसून चाैकशी केली जात असून त्याच्या अन्य ‘कारनाम्यां’चीही माहिती घेतली जात अाहे.