आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाने गर्भवती केलेल्या मुलीला सावत्र अाईने काढले घराबाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
पुणे - गेल्या सहा वर्षांपासून पोटच्या १२ वर्षीय मुलीसाेबत शारीरिक संबंध ठेवून बापाने तिला गर्भवती केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. दरम्यान, ही बाब मुलीने सावत्र आईला सांगिल्यानंतर तिने मुलीला हाकलून दिले. मुलीच्या तक्रारीनंतर आई- वडिलावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.   

पुण्यातील काळेवाडी परिसरात सदर कुटुंब राहते. पीडित मुलीच्या आईचे काही वर्षांपूर्वी  निधन झाल्याने ती वडील आणि सावत्र आईसोबत राहते. गेल्या सहा वर्षांपासून बापाने मुलीला धमक्या देऊन शारीरिक संबंध ठेवले.  मुलीने नकार िदल्यास वडील तिला शिवीगाळ करून मारहाण करत हाेते. याबाबत मुलीने सावत्र अार्इला वेळाेवेळी माहिती दिली. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष करून मुलीलाच त्रास देणे सुरू ठेवले.  तसेच याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. शुक्रवारी मुलगी गरोदर असल्याचे समजताच सावत्र आईने तिला घराबाहेर हाकलून दिले.