आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफटीआयआय आंदोलनाने गाठली शंभरी; तोडगा नाहीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शनिवारी शंभर दिवस पूर्ण झाले. कुठलाही तोडगा अद्याप दृष्टिपथात नसला तरी केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच पुन्हा चर्चेची तयारी दाखवल्याने आशेचा किरण निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी १७ सप्टेंबरला मंत्रालयाला पत्र लिहून पुन्हा चर्चेची तयारी असल्याचे कळवले आहे. निदर्शने, दिल्लीवारी, पत्रापत्री, राजकारणी व चित्रपट कलाकारांचा हस्तक्षेप, अटकसत्र, उपोषण, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी..अशा नाट्यातून विद्यार्थ्यांचे हे आंदोलन शंभर दिवस सलग सुरू आहे.
आंदोलनातले टप्पे
९ जून २०१५ : संस्थेच्या संचालक मंडळावर गजेंद्र चौहान व अन्य सदस्यांची नेमणूक जाहीर
१२ जून : या नेमणुकांना विरोध करत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू
१६ जून : पासून विविध संस्था, राजकीय पक्षांची आंदोलनात उडी
३ जुलै : विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय चर्चा
१३ जुलै : एफटीआयआय संचालक पदासाठीच्या मुलाखती पुढे ढकलल्या
१८ जुलै : डी. जे. नारायण यांचा कार्यकाळ संपला
प्रशांत पाठराबे यांची प्रभारी संचालकपदी नियुक्ती
२४ जुलै : संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांना अटक
३१ जुलै : राहुल गांधी संस्थेत
२२ ऑगस्ट : केंद्रीय समिती संस्थेत दाखल
१ सप्टेंबर : कंत्राटी कामगारांना मुदतवाढ
७ सप्टेंबर : विद्यार्थ्यांचा उपोषणाचा इशारा
८ सप्टेंबर : राजू हिरानींचा अध्यक्षपदास नकार
१० सप्टेंबर : उपोषणाला सुरुवात
उचलखर्चात गोलमाल : विजय कुंभार
माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनातील विद्यार्थ्यांचा दिल्लीचा विमानखर्च, आंदोलक विद्यार्थ्यांच्या उपचारांचा खर्च यांच्या बरोबरीने वेळोवेळी विद्यार्थ्यांनी उचल म्हणून घेतलेल्या रकमांचा आकडा २० लाखांच्या घरात आहे. या रकमेच्या हिशेबाविषयी अळंटळं सुरू असून पारदर्शकता राहिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कुणी आजारी पडले म्हणून त्याला घरी पोचवण्यासाठी खर्च, कुणाला सहानुभूती म्हणून पैसे देणे, आजाऱ्यासोबतच्या व्यक्तीचा खर्च, मैफलीसाठी खर्च... असे खर्च दाखवण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली. अशा प्रकारची उचल विद्यार्थ्यांना देणारी आणि नंतर हिशेब न मागणारी ही एकमेव संस्था असावी, असेही त्यांनी म्हटले आहे.