आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंगीचे औषध पाजून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत केला विवाह, FBवरील अाेळख तरुणीला पडली महागात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुणे - गुंगीचे औषध पाजून तरुणीशी जबरदस्तीने विवाह करणाऱ्या भामट्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, फेसबुकवर ओळख झाल्यानंतर त्याने तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करत हा  प्रकार केल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे.
 
सागर कृष्णा लांगे (३३, रा. देहू राेड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय पीडितेने पिंपरी पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारकर्ती तरुणीचे वडील इस्टेट एजंटचे काम करतात.
 
तरुणी ही चिंचवड येथे मॅनेजमेंटचे शिक्षण घेते. दाेन वर्षांपूर्वी तिची जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या सागर लांगे याच्याशी फेसबुकवर अाेळख झाली. फेसबुकवरील मैत्रीचे रूपांतर  प्रेमसंबंधात झाले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. सागरने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिने नकार देताच एक दिवस त्याने तिला गुंगीचे औषध पाजून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तिच्यासोबत विवाह केला. मात्र, हे  लग्न मान्य नसल्याने तरुणीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर सागरला अटक करण्यात आली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...