आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इको बटालियनची सुरुवात लातूर शहरातून करणार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पुण्यात माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यभरात रेल्वे आणि लष्कराच्या जागांवर वृक्षारोपण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यापैकी लष्कराच्या जागांवर इको बटालियनद्वारे वृक्षारोपण केले जाणार आहे. त्याची सुरुवात लातूरमधून होणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी रात्री दिली. 
 
राज्यात वन विभागाच्या वतीने एक ते सात जुलै दरम्यान चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम होणार आहे. त्याच्या तयारीसाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात रेल्वेच्या सुमारे पाच हजार मालमत्ता आहेत. आगामी तीन वर्षे तेथे वृक्षारोपण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.  
 
कर्जमाफी नव्हे कर्जमुक्ती 
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा ते कर्जाच्या चक्रात सापडणार नाहीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना वीज, पाणी, पतपुरवठा, विपणन आणि प्रक्रिया उद्योग यांची उपलब्धता असेल तर ते बरेच काही करू शकतात. त्यांना दयेपेक्षा पाठिंबा दिला पाहिजे. अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठीच्या कुठल्याही तरतुदीत कपात होणार नाही, असेही त्यांनी 
स्पष्ट केले.  
 
समृद्धी महामार्गासाठी अधिभार लादणार नाही
नागपूर
- मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासात नव्याने भर घालणारा महामार्ग ठरणार अाहे. या महामार्गासाठी राज्य शासनाने ४० वर्षांचे कर्ज घेतले आहे. त्याचा व्याजदर फारच कमी आहेत. या महामार्गामुळे प्रगती होणार यात शंकाच नाही. मात्र त्यासाठी अधिभार लावण्यात येत आहे, हा गैरसमज आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या की व्हॅटचे नुकसान होते. महसुली तूट भरून काढण्यासाठी व्हॅट आहे. तूट कमी करण्यासाठी भांडवली खर्च वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल कमी झालेला नाही, असेही ते म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...