आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एफटीआयआयच्‍या अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहानांची उचलबांगडी होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळ अध्यक्षपदावरून अभिनेते गजेंद्र चौहान यांची उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात चौहान यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बोलावून घेतल्याची माहिती एफटीआयआयमधील सूत्रांनी दिली. त्यांच्या जागी प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

चौहान यांच्या नियुक्तीला विरोध म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला विविध कलाकार, संस्था, राजकीय पक्ष व नेतेमंडळींनी पाठिंबा दिला आहे. चौहान यांची नियुक्ती राजकीय हस्तक्षेपातून झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तसेच अन्य सदस्यांच्या ‘लायकी’वरही त्यांनी प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत.