आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडळ कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- येत्या गणेशोत्सवात कोणतेही विघ्न येणार नाही. याआधी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी अध्यादेश काढण्यात आलेला आहे. पोलिसांना तशाप्रकारचा आदेश लवकरच दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात सांगितले. फडणवीस म्हणाले, गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयात सरकारने भूमिका मांडली असून महापालिकांना त्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. या वेळी सांस्कृतिक व शैक्षणिक मंत्री विनोद तावडे म्हणाले, रस्त्यावरील उत्सव रस्त्यावरच साजरे होतील. सर्व गणेश मंडळाच्या मदतीने राज्यात गणेशोत्सव यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

मुंबईत सहा हजार सीसीटीव्ही बसवू
पुणे हे देशातील महत्त्वपूर्ण शहर असून सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून संपूर्ण शहरभर सीसीटीव्हीची अत्याधुिनक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गुन्हे राेखणे, गुन्ह्यांचा तपास करणे तसेच संवेदनशील ठिकाणी सतत पाहणी करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयाेग ‘स्मार्ट पोलिसिंग’साठी होणार आहे. मुंबई शहरात सहा हजार सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात येणार असून त्याचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१५ पर्यंत तर शेवटचा टप्पा ऑक्टोबर २१०६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.
कानून के हाथ लंबे होते हैं...
अण्णाभाऊ साठे महामंडळात भ्रष्टाचार करणारे साेलापूर िजल्ह्यातील माेहाेळचे अामदार रमेश कदम यांच्या भ्रष्टाचाराचा पोलिसांनी छडा लावला आहे. सीआयडीने त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे एकत्रित केले असून त्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. आमदार कदम फार काळ पळू शकणार नाहीत, असे सांगत "कानून के हाथ लंबे हाेते हैं' असा फिल्मी डायलॉग या वेळी म्हटला.
पुण्यावर १२५० सीसीटीव्हींची नजर
पुण्यात ४४० ठिकाणी बसवलेल्या १२५० सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून करडी नजर राहणार आहे. फडणवीस म्हणाले, अाम्ही सत्तेत आल्यानंतर तीन-चार वर्षांपासून रखडलेली रिक्त पदांची पोलिस भरती वेगाने पूर्ण केली आहे. २००८ पासून राज्यातील गुन्हे सिद्धीचे प्रमाण ९ टक्क्यांवर असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करून ते ३२ टक्क्यांपर्यंत आणले आहे. आरोपींवर जरब बसविण्यासाठी गुन्हे सिद्धीचे प्रमाण लवकरच ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वेळी गृहराज्यमंत्री राम शिंदे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिराेळे यांची उपस्थिती होती.
प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉ लेज
ससून रुग्णालयातील कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, राज्यात डॉक्टर्सची संख्या कमी असून अनेक जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय नाही. ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी राज्यातील ज्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्या जिल्ह्यांमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. पीपीपीच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास शासनाचा त्यावर अंकुश राहील, त्याचबराेबर खासगी आर्थिक स्रोतही उपलब्ध होईल. यासाठी पुढील काळात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील.