आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिमझिम पावसाच्या साक्षीने ‘एनडीए’ची पासिंग अाऊट परेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडमिरल सुनील लांबा यांच्याकडून मानाचे पदक स्वीकारताना कॅडेट. - Divya Marathi
अॅडमिरल सुनील लांबा यांच्याकडून मानाचे पदक स्वीकारताना कॅडेट.
पुणे  - खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीत (एनडीए) तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर स्वप्न साकार झाल्याचा अानंद मंगळवारी सर्वच कॅडेट्सच्या चेहऱ्यावर दिसून येत हाेता. शिस्तप्रिय संचलन, पासिंग अाऊट परेड पाहण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह कुटुंबीय व नातेवाइकांची उपस्थिती त्यांचा उत्साह द्विगुणीत करणारी हाेती. अशातच अाकाशात दाटून अालेल्या ढगांतून रिमझिम पाऊस पडू लागल्याने कॅडेट्सनीही जल्लाेषात हा साेहळा साजरा केला.  
 
नाैदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांनी पासिंग अाऊट परेडची पाहणी करत कॅडेटच्या मानवंदनेचा स्वीकार केला. या वेळी एनडीएचे कमांडंट एअर मार्शल जसजित सिंग क्लेर, डेप्युटी कमांडंट रिअर अॅडमिरल एस. के. ग्रेवाल उपस्थित हाेते. याप्रसंगी नाैदल प्रमुखांच्या हस्ते राष्ट्रपती सुवर्णपदक कॅडेट व्ही. एस. सैनी, सिल्व्हर पदक कॅडेट संयम द्विवेदी, तर ब्राँझ पदक कॅडेट अाकाश के. अार. यांना प्रदान करण्यात अाले. याप्रसंगी ध्रुव हेलिकॉप्टर व सुखाेई यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.   
 
नाैदलप्रमुख लांबा यांनी म्हणाले, जानेवारी १९७४ मध्ये मी एनडीएत प्रवेश केला, ते दिवस अाज मला पुन्हा अाठवतात. या पासिंग अाऊट परेडला उपस्थित राहणे ही माझ्याकरिता अभिमानाची बाब अाहे. एनडीएतील खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याकरिता कॅडेटना त्यांच्या पालकांनी पाठबळ दिले याचे काैतुक वाटते. करिअरदरम्यान अाव्हानात्मक परिस्थितीचा मुकाबला करण्याकरिता कॅडेटने अत्याधुनिक प्रशिक्षण घेत राहावे. जबाबदारी, नीतिमत्ता, शिस्त याची शिकवण एनडीए देत असून त्याचा वापर करिअरमध्ये केला पाहिजे. अापल्या जबाबदारीचे भान ठेवत देशाच्या रक्षणाकरिता सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवावी.   चांगल्या व वाईट गाेष्टींची विभागणी वेळीच कॅडेटला करता यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 
 
अायुष्य कसे जगावे ते ‘एनडीए’त शिकलाे  
राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता कॅडेट व्ही. एस. साेनी याने भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘मी हरियाणातील साेनिपत येथील असून पुंछपुरा सैनिक स्कूलमध्ये माझे शिक्षण झाले अाहे. माझे वडील व्यावसायिक असून अाई गृहिणी अाहे. एनडीएतील तीन वर्षांत अायुष्य कसे जगायचे हे मी शिकलाे असून यापुढील काळात लष्करात दाखल हाेणार अाहे.’  
 
खडतर प्रशिक्षण नंतर खूपच सुकर  झाले
उत्तर प्रदेशातील कानपूरचा राैप्यपदक विजेता संयम द्विवेदी म्हणाला, ‘माझ्या घरात लष्कराची पार्श्वभूमी नाही. एनडीएतील प्रशिक्षण खडतर हाेते, मात्र यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचा अानंद अाहे, तर केरळमधील एर्नाकुलमचा अाकाश के. अार. म्हणाला, ‘माझे वडील प्राचार्य असून अाई गृहिणी अाहे. एनडीएतील प्रशिक्षण सुरुवातीला खडतर हाेते, मात्र सरावानंतर ते सुकर झाले.’  
 
पुढील स्लाइडवर पाहा परेड व्हिडिओ आणि काही क्षणचित्रे..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...