आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या गुरुत्व लहरींची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- खगोलशास्त्राच्या  विश्वातले नवे पर्व सुरू करणारे नवीन संशोधन सोमवारी जगभरात जाहीर करण्यात आले. दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या गुरुत्व लहरींची नोंद संशोधकांनी केली आहे. या गुरुत्व लहरींचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे गॅमा किरणांचे ‘फ्लॅश’ न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टकरीतून निर्माण होतात, हेही नव्याने संशोधित झाले आहे. या फ्लॅशची नोंद जगभरातील वेधशाळांनी एकाच वेळी टिपली आहे.  

या महत्त्वपूर्ण शोधात भारतीय संशोधक आणि वेधशाळांचाही मोलाचा सहभाग अाहे. देशातील १८ संस्थांंंमधील खगोलतज्ज्ञांचा या शोधात वाटा आहे. सोमवारी वॉशिंग्टन, लंडन, म्युनिक आणि भारतातील आयुका येथे एकाच वेळी पत्रकार परिषद घेऊन या संशोधनाचे तपशील जाहीर करण्यात आले. जगभरात अस्तित्वात असणाऱ्या तीन लायगो वेधशाळांनी (लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्व्हेटरी) १७ ऑगस्टला दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद केली. त्याचप्रमाणे या टकरीतून निर्माण झालेला गॅमा किरणांचा फ्लॅश (प्रकाश) गुरुत्वीय लहरींची नोंद घेतल्यानंतर अवघ्या दोन सेकंदांनी जगभरातील वेधशाळांनी टिपला. गुरुत्व लहरींचे ‘श्राव्य’ रूप अनुभवल्यानंतर प्रथमच गुरुत्व लहरींच्या अस्तित्वाचा स्पष्ट पुरावा देणारे ‘दृश्य रूप’ (फ्लॅश) प्रकाशात आले आहे. या नव्या संशोधनाने खगोलशास्त्रात विश्वाची निर्मिती, टप्पे, प्रसरणाचा वेग यांवरील संशोधनाला गती मिळेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.  दोन न्यूट्रॉन ताऱ्यांचा संयोग होत असताना, सुमारे शंभर सेकंदांपर्यंत गुरुत्वीय लहरी निर्माण झाल्याची नोंद झाली. गेल्या पाच वेळांतही ही सर्वांत तीव्र व जास्त काळ टिकलेली नोंद आहे, अशी माहिती अायुकातील शास्त्रज्ञ   दीपांकर भट्टाचार्य यांनी दिली. आढळलेले सिग्नल्स सर्वांत शक्तीशाली आहेत. त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतरही १३० कोटी प्रकाशवर्षे इतके आहे. गॅमा किरणांचा फ्लॅश पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांनीही टिपला आहे. शिवाय अशा संयोगातून, टकरीतून सोने, प्लॅटिनमसारखे मौल्यवान धातू निर्माण होण्याचेही हे ठिकाण आहे.

भारताचे योगदान  
आजवर पाच वेळा गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व नोंद झाले आहे. त्यात आणि नव्या शोधातही भारतीय संशोधकांसह वेधशाळांचाही सहभाग आहे. गुरुत्वीय लहरींची नोंद झाल्यावर त्या घटनेचे आकाशात इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्हजमध्ये काही परिणाम दिसतात का, याचा शोध अॅस्ट्रोसॅट, जीएमआरटी (जाएंट मीटरव्हेवरेडिओ टेलिस्कोप) आणि हिमालयन चंद्रा टेलिस्कोप या वेधशाळांतून यशस्वीपणे घेण्यात आला.   
बातम्या आणखी आहेत...