आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंगत्वावर मात करून गाजवले मैदान! तेलंगणाचे माजी सैनिक रेड्डींना राष्ट्रीय स्पर्धेत पदके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लष्कराची अावड असलेला तेलंगणातील मेहबूबनगरचा एक तरुण सैन्यात दाखल झाला. देशाची सेवा करताना राजस्थानमधील पाेखरण येथे एक अपघात झाला व त्यात कायमचे अपंगत्व अाले. मात्र, तरीही त्यामुळे  खचून न जाता अपंगत्वावर मात करून विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवण्यात हा माजी सैनिक यशस्वी ठरला. के. एन. रेड्डी या खेळाडूचे नाव अाहे. जयपूर येथे नुकत्याच झालेल्या १७व्या नॅशनल पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने थाळीफेकमध्ये सुवर्ण, तर गाेळाफेकमध्ये राैप्यपदक मिळवले अाहे.  

रेड्डी याचे घरची अार्थिक परिस्थिती बेताचीच. लष्कराचे अाकर्षण असल्याने एनसीसीत दाखल झाला. त्यानंतर  हैदराबाद येथे १९९४ मध्ये झालेल्या लष्कर भरतीतही त्याची निवड झाली. हिस्सार येथे काही काळ देशसेवा केल्यानंतर नाेव्हेंबर १९९७ मध्ये पाेखरणजवळ फिल्ड फायरिंग सरावास जात असताना, लष्कराचा ट्रक उलटला व शस्त्रसाठा अंगावर पडून रेड्डींच्या पाठीतील मज्जारज्जूला दुखापत झाली अाणि कमरेपासून खाली कायमचे अपंगत्व अाले. 

खेळातून मनाला समाधान  
खेळातून मनाला समाधान मिळत अाहे. मात्र, काेणत्याही स्पर्धेकरिता पॅरालेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर साेडून इतरत्र जाणे अडचणीचे ठरू लागले अाहे. दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर स्पर्धेच्या ठिकाणी प्रवास करणे, खाणे-पिणे, राहणे या गाेष्टींवर अपंगत्वामुळे मर्यादा येत अाहेत. महाराष्ट्राकडून राष्ट्रीय स्तरावर खेळत असूनही शासनाकडून आर्थिक पाठबळ अद्याप मिळालेले नाही. खेळातील काेणताही शासकीय पुरस्कार न मिळाल्याचा खेद वाटताे.   
- के. एन. रेड्डी, खेळाडू  
 
  पुढील स्लाईडवर पाहा तेलंगणाचे माजी सैनिक रेड्डींचे काही फोटोज.... 
बातम्या आणखी आहेत...