आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेशल मीडिया हॅक पीडितांंना व्हाॅट‌्सअॅप ग्रुपद्वारे मदत, ‘अाेटीपी’ काेणाला देऊ नका : अॅड. पिंगळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे  - अाजकाल तरुणाई माेठ्या प्रमाणात साेशल मीडियाचा वापर करू लागली अाहे. या माध्यमाद्वारे संवाद साधण्यासाेबतच अार्थिक व्यवहारही हाेऊ लागल्याने एखाद्या व्यक्तीचे बँक अकाउंट हॅक करणे, त्याची बदनामी करण्याचे अथवा अार्थिक फसवणुकीचे प्रकार हॅकर्सकडून वाढू लागले अाहेत. अशा पीडितांच्या मदतीसाठी तरुणाई सरसावली अाहे.  विशाखा जैन या तरुणीने अशा ४० पीडितांना एकत्र करत सायबर क्राइमविराेधात जनजागृती माेहीम हाती घेतली अाहे. त्यांच्या मदतीसाठी ‘हॅकर्स डिकाेडर’ या व्हाॅट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून समुपदेशन सुरू केले अाहे.   
 
एखाद्याचे व्हाॅट्सअॅप, फेसबुक अकाउंट हॅक करून त्याद्वारे इतरांना अश्लील मेसेज, व्हिडिअाे पाठवण्यात अाल्याचे अनेक प्रकार सध्या घडत अाहेत. अशा प्रकारे संबंधित युजरची बदनामी केली जाते. तसेच साेशल मीडियावर अाेळख वाढवून नंतर काही अडचणीत असल्याचे कारण सांगून पेटीएम किंवा इतर वाॅलेटद्वारे पैशाची मागणीही करण्यात अाल्याचे अनेक प्रकार घडलेले अाहेत. काही लाेक अापले बँक अकाउंट हॅक करून किंवा बँकेतून बाेलत असल्याचे खाेटे सांगून एटीएम कार्डचा पासवर्ड विचारून घेतात. व्हाॅट्सअॅप, फेसबुकचा व्हेरिफिकेशन काेड, अाेटीपी घेऊनही फसवणुकीचे प्रकार घडत अाहेत. अशा प्रकारच्या असंख्य तक्रारी पाेलिसांच्या सायबर सेलकडे प्राप्त झालेल्या अाहेत.   अशा प्रकारात फसवणूक झाल्यानंतर नेमकी तक्रार कशी व काेणाकडे करावयाची, काेणाचे मार्गदर्शन घ्यावयाचे, पुन्हा असे प्रकार घडू नयेत याकरिता काेणती खबरदारी घ्यावयाची याबाबत अनेकांना संभ्रम असताे. काही लाेक बदनामीमुळे तक्रारही करण्यास धजावत नाहीत. अशा लाेकांना मानसिक अाधार देण्याबराेबरच कायदेशीर मदत,
सल्ला देण्याचे काम ‘हॅकर्स डिकाेडर’ हा ग्रुप करत अाहे.  
 
विशाखा जैन यांनी सांगितले की, मी उद्याेजिका असून माझे व्हाॅट्सअॅप अकाउंट हॅक झाले हाेते. नंतर या अकाउंटवरून हॅकर्सनी अश्लील मेसेज, व्हिडिअाे माझ्या मित्र-मैत्रिणींना पाठवले. अशा अडचणी इतरांनाही येत असतात. त्यामुळेच अाम्ही  ‘हॅकर्स डिकाेडर’ हा ग्रुप तयार केला अाहे. या ग्रुपवर सायबर सेल तज्ज्ञ संदीप गदिया, कायदेशीर बाबींकरिता सायबर अॅड. राजस पिंगळे, अँटी हॅकर तज्ज्ञ मन्नू मेमाॅन तसेच पीडितांना मार्गदर्शनासाठी निशा उत्तरवार, अकबर अन्सारी, केतन गठानिया यांची टीम तयार करण्यात अाली अाहे.  
 
‘अाेटीपी’ काेणाला देऊ नका : अॅड. पिंगळे 
सायबरतज्ज्ञ अॅड. राजस पिंगळे यांनी सांगितले की, ‘साेशल मीडियावर अालेल्या अनाेळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, अापला व्हाॅट्सअॅप, फेसबुकचा काेड, अाेटीपी क्रमांक अज्ञातास देऊ नका. साेशल नेटवर्किंग साइटवर स्वत:चा माेबाइल नंबर ठेवू नका. पेटीएमद्वारे पैशाची मागणी करत असेल तर संबंधित व्यक्तीची खातरजमा करूनच अार्थिक व्यवहार करा. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...