आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलाप्रवासात संयम, साधना महत्त्वाची; पंडित भवानी शंकर यांची भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘कोणतीही कला शिकणे म्हणजे तिची भक्ती अर्थात इबादत  करणे होय. त्यामुळे ते करीत असताना संयम, साधना आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो,’ असे मत प्रसिद्ध पखवाजवादक पं. भवानी शंकर यांनी व्यक्त केले. निमित्त होते पुण्यातील ‘हेरिटेज–द आर्ट लेगसी’ संगीत अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूडचा प्रवास’ या विषयावरील  प्रकट मुलाखतीचे. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी पं. शंकर यांची मुलाखत घेतली. पं. शंकर यांनी या वेळी उपस्थितांसमोर शास्त्रीय संगीतातील पखवाजाचे महत्त्व, त्याचा इतिहास याबरोबरच आजपर्यंतचा बॉलीवूडमधील पखवाजाचा प्रवास विशद केला.   


हेरिटेज- द आर्ट लेगसी’ संगीत अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष संतोष पोतदार, पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर आदी या वेळी उपस्थित होते.   या वेळी पं. शंकर म्हणाले, ‘कोणतीही कला शिकणे म्हणजे अथांग सागरात मोती शोधण्याच्या आशेने  चाचपडणेच होय. मात्र हे करीत असताना तुमच्यातला  संयम, ती कला शिकण्याची आस्था, साधना, मेहनत आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न हे सर्वात जास्त महत्त्वाचे असतात. आज केवळ गुरूंचे नाव सांगून मी याचा शिष्य, त्याचा शिष्य असे सांगणारे अनेक जण भेटतात. मात्र त्या गुरूची कला आत्मसात करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे कला सादर करणारे अगदीच कमी असतात. जर कला शिकायची असेल तर गुरू जसे सांगतात तशीच ती शिकली गेली पाहिजे. पं. भवानी शंकर यांनी पखवाजाच्या ठेक्यावर सादर केलेल्या रावणस्तुती आणि हनुमान चालिसाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यानंतर त्यांनी बॉलीवूडमधील काही गाणी देखील पखवाज आणि तबल्यावर सादर केली.

बातम्या आणखी आहेत...