आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी ऑक्टोबर परीक्षेचा निकाल २१.५९ टक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑक्टोबर २०१५ मधील बारावीच्या परीक्षेचा निकाल २१.५९ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण ७६२७० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६,४६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाच्या टक्केवारीत औरंगाबाद (३६.२५ टक्के) आघाडीवर असून मुंबईचा क्रमांक अखेरचा (१७.९२ टक्के) आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णांची टक्केवारी घसरली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर परीक्षेत २६.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा हे प्रमाण २१.५९ इतके आहे. ऑक्टोबर परीक्षेला बसलेल्या ७६ हजार २७० विद्यार्थ्यांपैकी फक्त २३ गैरप्रकारांची नोंद करण्यात आल्याची माहिती मंडळातर्फे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली. गुणपत्रिकांचे वाटप कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २० नोव्हेंबरला केले जाणार आहे.

विभागनिहाय : पुणे – १९.९३ %, नागपूर – २३.८२ %, औरंगाबाद – ३६.२५ %, मुंबई – १७.९२ %, कोल्हापूर – २०.२० %, अमरावती – २१.३१ %, नाशिक – १९.९० %, लातूर – २९.१८ %, कोकण – २०.२० %.