आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेग्य दरात ‘स्टेंट’ न मिळाल्यास करा ‘अन्न अाैषधी’कडे तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे -हृदयरुग्णांना लागणाऱ्या ‘स्टेंट’च्या किमती शासनाने कमी केल्यावरही उत्तम दर्जाचे स्टेंट न मिळणे किंवा अधिक किंमत आकारली जाणे, अशा तक्रारींसाठी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे (एफडीए) मुंबईसह पुण्यातही विशेष तक्रार निवारण क्रमांक उपलब्ध केला आहे. 
राज्यातील अनेक जिल्हे आणि तालुक्यांतून हजारो रुग्ण स्टेंट उपचारांसाठी पुण्यात रोज येतात.
 
त्यांच्या सोयीसाठी आता पुण्यात (०२०) २४४६७२५९ हा क्रमांक एफडीएने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे रुग्णांसाठी आता राज्यासाठीची १८००२२२३६५ ही हेल्पलाइन आणि नवा तक्रार निवारण क्रमांकही उपलब्ध झाला आहे. एफडीएच्या औषध विभागाचे सहआयुक्त व्ही. ए. जावडेकर यांनी ही माहिती दिली.
 
नॅशनल फॉर्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटी (एनपीपीए) ने फेब्रुवारीच्या १४ तारखेला स्टेंटच्या किमती ठरवून दिल्या आहेत. मात्र, लगेचच स्टेंटच्या तुटवड्याच्या तक्रारीही वाढत्या संख्येने येऊ लागल्याने एफीडएने रुग्णांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलले आहे. 
 
बेअर मेटल स्टेंटची किंमत ७२६० रुपये   

बेअर मेटल स्टेंटची किंमत ७२६० रुपये,  ड्रग इल्युटिंग स्टेंट – २९,६०० रुपये, अशा नव्या किमती आहेत. त्यात व्हॅट आणि स्थानिक कर समाविष्ट केल्यावर अनुक्रमे ७६२३ आणि ३१०८० रुपयांपेक्षा जास्त किमती नसतील. 
 
बातम्या आणखी आहेत...