आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग प्रकरणातील अाराेपीला 48 तासांत तुरुंगवासाची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चाकण येथील एका तरुणीच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाने जलदगतीने न्यायनिवाडा करत आरोपी तरुणाला दोन वर्षे सश्रम तुरुंगवास आणि ५०० रुपये दंडाची  शिक्षा सुनावली. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान, राज्यातील आजवरील सर्वात जलदगतीने न्यायनिवाडा देणारे हे प्रकरण ठरले आहे.  अतुल गणेश पाटील (रा. चाकण, पुणे) असे शिक्षा सुनावण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी ही चाकण येथील एका कंपनीत नोकरीला आहे. पाटील हा तिथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत हाेता. तरुणीने कंपनीच्या नोंदवहीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पाटील याने २८ डिसेंबर २०१६ ते १ जानेवारी २०१७ दरम्यान तिला फोन करून अश्लील  व्हिडिओ पाठवले. त्यानंतर तिने याप्रकरणी चाकण पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पाटील याला ८ जानेवारीला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यानंतर केवळ ४८ तासांत सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने त्याला दोन वर्षे सश्रम तुरुंगवास आणि ५०० रुपये दंड ठाेठावला.