आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमी भावासाठी सीएम ते पीएमच्या गावांत माेर्चा, अपक्ष अामदार बच्चू कडू यांची पुण्यात माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेतकऱ्यांच्या मालास याेग्य हमी भाव मिळावा, ग्रामीण भागात गरिबांना घरे मिळावी, स्वामिनाथन अायाेगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, या प्रकारच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगरच्या घरापर्यंत (गुजरात) “शेतकरी आसूड मोर्चा’ काढणार असल्याची माहिती अामदार बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. 

हा मोर्चा ११ ते १८ एप्रिलदरम्यान काढला जाणार आहे.  कडू म्हणाले, महात्मा फुले जयंतीचे अाैचित्य साधून नागपुरातून ११ एप्रिल राेजी या माेर्चास सुरुवात होईल. सुमारे २ हजार किलाेमीटरचे अंतर पार करून पंतप्रधान माेदी यांच्या वडनगर गावात त्याचा १८ एप्रिल रोजी समाराेप होईल. या ठिकाणी १ हजार शेतकरी रक्तदान करतील. धान्य, भाजीपाला नागरिकांना स्वस्त देण्यास अामचा विराेध नाही. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांचे खिसे कापू नये. राज्य सरकारने पिकांचे हमी भाव कमी केले असून तूरडाळीचा भाव गडगडलेला अाहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

 शेती हमी भावाकरिता राज्य सरकारने केंद्राकडे केलेली शिफारस, केंद्राने जाहीर केलेल्या आणि प्रत्यक्ष बाजारातील दरात तफावत आहे. त्यामुळे शेतकरी अात्महत्येच्या दुष्टचक्रात अडकत अाहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्यावर पुन्हा शेतकरी कर्जबाजारी हाेणार नाही याकरिता दीर्घकालीन धाेरण ठरवून  व्यवस्था परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...