आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रासह बारा राज्यांमध्ये वाढला ‘इसिस’चा प्रभाव, एटीएसची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महाराष्ट्रासह १२ राज्यांत इसिसचा प्रभाव वाढल्याचे चित्र आहे. राज्यातील काही युवक या संघटनेकडे आकर्षित झाले आहेत, अशी कबुली राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख (एटीएस) विवेक फणसळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. या भरकटलेल्या तरुणाईला परावृत्त करण्यासाठी एटीएसने प्रयत्न सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून एटीएस लवकरच संकेतस्थळ सुरू करणार असून त्याद्वारे तरुणांचे प्रबोधन करू, असे त्यांनी सांगितले.
तपास यंत्रणांनी विविध राज्यांतून इसिसशी संबंधित १६ तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर फणसळकर यांनी रविवारी पुणे एटीएसच्या कार्यालयाला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला.
९४ संकेतस्थळे केली बंद
फणसळकर म्हणाले, ‘इसिसशी संबंधित ९४ संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत. त्या माध्यामातून तरुणाईला आकर्षित केले जात होते. विविध प्रलोभने दाखवली जात होती. सर्व राज्यांनी तपास करून अशा संकेतस्थळांची यादी केंद्राकडे पाठवली होती व ती बंद करण्याची मागणी केली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, आता एटीएस काय करणार...