आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्षेपणांची संख्या तिपटीने वाढवणार, ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. किरणकुमार यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सध्यावर्षभरात आपण अवघी तीन-चार प्रक्षेपणे करतो. प्रक्षेपणे आणि प्रक्षेपक यांची संख्या येत्या ते वर्षांत तिप्पट करण्यात येईल, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. ए. एस. किरणकुमार यांनी येथे दिली. आगामी तीन वर्षांत आपल्या प्रक्षेपणांची संख्या १८ वर नेण्याचा प्रयत्न राहील. सध्या प्रक्षेपणासाठी दोनच तळ आहेत. त्यात लॉंच पॅड आणि असेंब्ली पॉइंटची भर घातली जाईल, असे ते म्हणाले.
अंतहीन विस्तारलेल्या अवकाशाचा वेध घेण्यासाठीचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. इस्रो त्यासाठीच प्रयत्नशील आहे. नुकताच इस्रोने ‘अस्ट्रोसॅट’ हा विविध तरंग लांबीसाठी समर्पित असा खगोलीय उपयोगाचा उपग्रह अवकाशात पाठवला. अंतराळात असा उपग्रह सोडणारा भारत हा जगातला फक्त चौथा देश ठरला आहे, अशी माहिती देत डॉ. किरणकुमार यांनी इस्रोच्या भावी वाटचालीची उपक्रमांची माहिती सांगितली. अस्ट्रोसॅट उत्तम कामगिरी करत आहे. त्याच्या उभारणीत देशातल्या विविध संशोधन संस्थांनी सहभाग घेतला. आता त्याच्याकडून मिळणारा माहितीसाठाही विविध संस्थां, संशोधकांना उपलब्ध करून िदली जाणार आहे, असे किरणकुमार म्हणाले.

२०१७मध्ये चांद्रयान-२ मोहीम
चांद्रयान-१ नंतर २०१७ मध्ये चांद्रयान- मोहीम सुरू होणार आहे. त्याची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. चांद्रयान मध्ये नसणारे रोव्हर, लँडर चांद्रयान मध्ये असतील. महत्त्वाकांक्षी सार्क सॅटेलाइटही अंतिम टप्प्यात आहे. सात देशांपैकी सर्वात प्रथम सामंजस्य करार श्रीलंकेने केला आहे. राजनैतिक परवानग्या पार पडल्यानंतर सार्क सॅटेलाइटही अवकाशात झेपावेल, असे डॉ. किरणकुमार यांनी स्पष्ट केले.

आदित्ययान मोहिमेची आखणीही इस्रोमध्ये सुरू असून सूर्याचा अधिकाधिक अभ्यास करण्याचा उद्देश त्यामागे आहे. आदित्ययानासाठी अवकाशात ‘लायजॅटिक पॉइंट’ (विषुववृत्तापाशी कल्पिलेल्या बिंदूजवळ) शोधण्याचे आव्हान आहे. ते गाठले तर २४ तास सतत सूर्याचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात आदित्ययानाचे प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती डॉ. किरणकुमार यांनी दिली.