आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाॅटरी लागल्याचे अामिष दाखवून 2100 लाेकांना फसवणारा अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नागरिकांना माेबाइलवर संपर्क करून त्यांच्या क्रमांकाची कंपनीकडून निवड करण्यात आली आहे. तसेच तुम्हाला १८९९ रुपयांचे बक्षीस लागल्याची बतावणी करून सुमारे २१०० लोकांना फसवणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. बालाजी रामचंद्र मद्दीपटला (३२,रा. वानवडी, पुणे, मु.रा. कर्नाटक) असे त्याचे नाव अाहे.  

बालाजी हा नागरिकांना फोन करून तुम्हाला १८९९ रुपयांचे बक्षीस लागल्याचे सांगून त्यात एचएमटी घड्याळ व गाेल्ड प्लेटेड साेन्याची अमेरिकन डायमंड चैन, अापणास केवळ ५५० रुपयांत देण्यात येणार असल्याचे तो सांगायचा.  महेंद्र साेनवणे यांच्याकडून ५५० रुपये घेऊन त्यांना लाॅटरी लागल्याचे पार्सल देण्यात अाले हाेते. ते त्यांनी उघडून पाहिले असता त्यात बनावट एचएमटी कंपनीचे घड्याळ व साेन्याची अमेरिकन डायमंड चैन होती. त्यावरून त्यांनी शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पुन्हा त्यांना अशाच प्रकारे दुसऱ्यांदा फाेन येऊन लाॅटरी लागल्याचे सांगण्यात अाले. साेनवणे यांनी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकास याबाबत कळवल्यानंतर लाॅटरीचे पार्सल साेनवणे यांना देण्यासाठी अालेल्या अाराेपीस पाेलिसांनी अटक केली. 
 
अाराेपीच्या कंपनीत सहा जण कामाला   
अाराेपी बालाजी मद्दीपटला याने सप्टेंबर २०१७ पासून वैदिक बाजार नावाची कंपनी सुरू करून गेल्या दीड महिन्यात पुणे शहर व अाजूबाजूच्या परिसरातील सुमारे २१०० लाेकांची फसवणूक केल्याचे पाेलिस तपासात निष्पन्न झाले अाहे. तसेच त्याने त्याच्या कंपनीत मदतीसाठी सहा जणांना कामास ठेवले हाेते. अाराेपीच्या राहत्या घरातून ६५० बनावट एचएमटी कंपनीचे घड्याळ व बनावट साेन्याची अमेरिकन डायमंड चैन असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अाला.
बातम्या आणखी आहेत...