आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांशी लढताना पती शहीद, लेफ्टनंट वीरपत्नी करणार दहशतवादाशी दोन हात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- १७ नोव्हंेबर २०१५ चा तो दिवस. काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी धीर सोडला नाही. उलट ज्या दहशतवाद्यांशी लढत पतीने हौतात्म्य पत्करले त्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी लष्करात दाखल होण्याचा निश्चय केला मूळ शिक्षकी पेशात असलेल्या स्वातींनी चेन्नई येथे अकरा महिन्यांचे खडतर असे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. ही वीरपत्नी लेफ्टनंट म्हणून शनिवारी लष्करी सेवेत रुजू होत आहे. 

सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडीचे कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्म्यानंतर स्वाती लेफ्टनंट म्हणून देहू (जि. पुणे) येथे रुजू होतील. वास्तविक कर्नल पदावरील अधिकाऱ्याला हौतात्म्य येण्याची घटना दुर्मिळ असते. संतोष यांच्याबाबतीत हा दुर्धर प्रसंग ओढवला. त्यानंतर शिक्षिका असलेल्या स्वाती यांचे आयुष्यच बदलून गेले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या स्वाती यांनी अशा कसोटीच्या क्षणी सैन्यात जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता. 

एव्हरी ऑफिसर इज सोल्जर 
स्वातीयांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, ‘एव्हरी अाॅफिसर इज साेल्जर अँड एव्हरी साेल्जर इज अाॅफिसर, हे कर्नल संतोष यांच्या बटालियनचे ब्रीदवाक्य होते. त्यानुसारच मी काम करेन. कर्नल संतोष यांच्या इच्छेप्रमाणेच देशसेवा, मातृसेवा आणि समाजसेवेला माझे प्राधान्य असेल.’ 

सवलती नाकारल्या 
लष्करातदाखल होण्यासाठी शासन, लष्कराकडून सहानुभूतीची अपेक्षा नाही. सवलतीही नकोत. फक्त भरती प्रक्रियेसाठीची वयाची अट शिथिल करावी, अशी मागणी स्वाती यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी हुतात्मा जवानांच्या वीरपत्नींसाठी घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा दिल्या. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी चेन्नई लष्करी केंद्रात प्रवेश मिळवला. स्वराज आणि कार्तिकी या दोन मुलांपासून काही काळ दूर राहत त्यांनी जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण केले. 

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठीच... 
दहशतवादाचा देशासमोर मोठा धोका आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. या दहशतवादाविरुद्ध संघर्ष करण्यासाठीच मी लष्करात दाखल झाले आहे, असेही लेफ्ट. महाडिक म्हणाल्या. 
बातम्या आणखी आहेत...