आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबळेश्वरकडे जाणा-या रत्‍यांवरील खड्डे बुजवण्यासाठी ‘चिल्लर माेर्चा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाबळेश्वर- देशभरातील पर्यटकांचे अावडते थंड हवेचे ठिकाणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरकडे जाणारे रस्ते खड्डेमय झाले अाहेत.  या खराब रस्त्यांमुळे पर्यटकांना खूप त्रास हाेत असू्न काही गाड्यांचे अपघातही झाले अाहेत. हे खड्डे अाता तरी बुजवावेत, या मागणीसाठी गुरुवारी विद्यार्थ्यांनी गांधीगिरी करत अांदाेलन केले.

महाबळेश्वरहून दरराेज पाचगणीला शिकण्यासाठी सुमारे शंभर ते दीडशे मुले खासगी वाहनांतून ये- जा करतात. त्यांनाही या रस्त्यावर खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागताे. या सर्वांनी वारंवार मागणी करूनही रस्ते दुरुस्त हाेत नसल्याने अखेर गुरुवारी स्थानिक शाळकरी विद्यार्थ्यांनी ‘चिल्लर माेर्चा’ काढून अांदाेलन केले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता यांना निवेदन देऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही केली.  या अांदाेलनात विद्यार्थ्यांचे पालक व स्थानिक नागरिकही माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. ‘पर्यटकांना वाई ते महाबळेश्वर रस्त्यावरील खड्डे मोजून आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी...... आयोजक महाराष्ट्र शासन व पी.डब्ल्यू.डी., सातारा’ असे फलकही अांदाेलक विद्यार्थ्यांच्या 
हाती हाेते. 
बातम्या आणखी आहेत...