आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा अारक्षणासाठी आता पुण्यात अर्धनग्न माेर्चा; मूक मोर्चा आयोजकांनी मात्र फिरवली पाठ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे १० मे रोजी पुण्यात गोखले संशोधन संस्था ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार आहेत. तसेच मराठा अारक्षणासाठी राज्यभरात १० ते ३० मेदरम्यान बैठका व जाहीर सभा होतील, अशी माहिती प्रा. संभाजी पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.   

पाटील म्हणाले, राज्यभर अारक्षण सभा व मुंबई येथे ३० मे राेजी धडक माेर्चा काढण्यात येणार आहे. येत्या ११ मे ते ३० मेदरम्यान अाैरंगाबादपासून दुसऱ्या टप्प्यातील सभा व बैठका होतील. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, साेलापूर, सांगली, सातारा, काेल्हापूर, पुणे, ठाणे येथे सभा होतील.

मूकमाेर्चा अायाेजकांची पुणे मोर्चाकडे पाठ?
मराठा समाजाला आरक्षणासाठी राज्यभर लाखाेंच्या संख्येने मराठा क्रांती मूकमाेर्चे काढण्यात आले. या माेर्चातील अायाेजकांपैकी एकही जण या पत्रकार परिषदेस उपस्थित नव्हते. याबाबत पाटील म्हणाले, मूक माेर्चा अायाेजकांशी माझे बाेलणे झाले नाही. मी सर्वांना निराेप दिले होते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...