आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मसाप : पंचवार्षिक निवडणुकीत मिलिंद जोशी, पायगुडे, सुनीताराजे पवार विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यभरातील साहित्यसंस्थांची मातृसंस्था असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी ‘परिवर्तन’ घडले. प्रा. मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष), प्रकाश पायगुडे (प्रमुख कार्यवाह) आणि सुनीताराजे पवार (कोशाध्यक्ष) या तीन पदाधिकाऱ्यांसह परिवर्तन पॅनेलचे अन्य बहुतेक उमेदवारही विजयी झाले.

मसापची निवडणूक हा साहित्य वर्तुळातील औत्सुक्याचा विषय असतो. ही निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी निकालाची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार मिलिंद जोशी हे ४,२६३ मते मिळवून विजयी झाले. त्यांच्या विरोधातील राजीव बर्वे यांना २,४७९ मते मिळाली. जोशी यांच्या परिवर्तन पॅनेलचे २१ पैकी १४ उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवार असे
प्रा. मिलिंद जोशी - कार्याध्यक्ष, प्रकाश पायगुडे - प्रमुख कार्यवाह, सुनीताराजे पवार - कोशाध्यक्ष, दीपक करंदीकर, बंडा जोशी, उद्धव कानडे, माधव राजगुरू, वि. दा. पिंगळे, प्रमोद आडकर, शिरीष चिटणीस, डॉ. सतीश देसाई, डॉ. अरविंद संगमनेरकर, पुरुषोत्तम काळे, रावसाहेब पवार, राजन लाखे, विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकीहाळ, पद्माकर कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, कल्याण शिंदे, राजन मुठाणे, प्रकाश देशपांडे, सुरेश देशपांडे, पद्माकर शिरवाडकर, प्रभाकर संत, नितीन ठाकरे, प्रकाश होळकर, चंद्रकांत पालवे, येलुलकर जयंत, अंबर जगताप, शशिकला पवार, दशरथ पाटील ई.
निकाल विशेष
> मृत व्यक्तींच्या नावे १४ मतपत्रिका, बाद मते - २०८
> बारकोडमुळे डुप्लिकेट एकही मतपत्रिका नाही
> तीन स्कॅनरने बारकोड स्कॅनिंग
आता साहित्यकारण
^आता मसापमध्ये राजकारण नव्हे तर साहित्यकारणच होईल. संस्थेचा शतकोत्तर दशकपूर्ती समारंभ जवळ येत आहे. परिषदेला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ. राज्यभर साहित्य मेळावे घेऊन परिषदेच्या कार्याचा विस्तार होईल, यावर भर देऊ.
प्रा. मिलिंद जोशी, नवनिर्वाचित कार्याध्यक्ष , मसाप
बातम्या आणखी आहेत...