आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकारविराेधी माेर्चात मंत्री खाेतही सहभागी हाेणार? आज कोल्हापुरात आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे  - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फायरब्रँड नेते, कृषी राज्यमंत्री  सदाशिव खोत आणि संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यातले ‘अंतर’ वाढले असून कोणत्याही क्षणी हे दोन्ही नेते वेगळे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चार मे राेजी ‘स्वाभिमानी’ने कोल्हापुरात भाजप सरकारविरोधी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला राज्यमंत्री खोत उपस्थित राहतात किंवा नाही यावर संघटनेत उभी फूट कधी पडणार हे अवलंबून आहे.  

खोत आणि शेट्टी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. राज्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाल्यापासून खोत यांना सत्तेची चटक लागल्याचा आरोप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी ‘सदाभाऊ म्हणजे संघटना नव्हे. ते एक कार्यकर्ते असले तरी संघटनेच्या सर्व पदांवरून त्यांना मुक्त केले आहे,’ अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली अाहे. त्यामुळे खोत यांच्या मोर्चातल्या सहभागावरून आडाखे बांधले जात आहेत.  
 
ऊस उत्पादकांच्या प्रश्नावरून शेट्टी यांनी ४ मे रोजी कोल्हापुरात मोर्चाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच सर्व जिल्हाध्यक्षांना त्यांनी बैठकीसाठी बोलावले आहे. ‘स्वाभिमानी’ने भाजप सरकारच्या सत्तेत राहायचे की नाही याचा ऊहापोह बैठकीत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत सहभागी आणि त्याच वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनांसाठी रस्त्यावरही या दोन्ही भूमिका एकाच वेळी फार काळ निभावता येणार नाहीत. अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वास गमावण्याची पाळी येईल, अशी भीती शेट्टी समर्थकांना वाटते. त्यामुळेच सरकारमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शेट्टी यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय झाल्यास त्याची पहिली कुऱ्हाड खोत यांच्या मंत्रिपदावर पडेल.  मात्र, खोत संघटनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करतील का, याची खात्री शेट्टी यांना नाही. एकही आमदार निवडून न आल्याने सरकारची साथ सोडण्याच्या स्वाभिमानीच्या निर्णयाचा परिणाम   सरकारच्या स्थैर्यावर होऊ शकत नाही. शिवाय, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका येथेही काही ठिकाणी भाजपसोबत स्वाभिमानीची आघाडी आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शेट्टी यांच्यासाठीही सोपा नाही. 
 
सरकारचे काैतुक पुरे : शेट्टी
सदाभाऊ खोत यांनी स्वतःहून सत्ता सोडावी, अशी शेट्टी यांची इच्छा अाहे, मात्र  खोत यांनी अजूनतरी तसा मनोदय व्यक्त न केल्याने शेट्टींची पंचाईत झाली आहे. ‘संघटनेने ठराव करून खोत यांना मंत्रिमंडळात पाठवले आहे. त्यांनी भाजप सरकारचा उदोउदो करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय न घेणाऱ्या सरकारचा कौतुक सोहळा त्यांनी थांबवावा,’ असा शेट्टी यांनी दिलेला बोचरा सल्लाही खोत यांनी मनावर घेतलेला नाही.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, सदाभाऊ खाेत करणार राजू शेट्टींची अडचण...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...