आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षबचावासाठी आधुनिक ‘चिपको आंदोलन’, पर्यावरणप्रेमी झाडे वाचविण्यासाठी झाडाजवळ झाेपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुणे - पुणे विद्यापीठ ते औंधजवळचा ब्रेमेन चौक या मार्गावरील जुने वृक्ष रस्तारुंदीकरण आणि बीआरटीच्या नावाखाली तोडण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पुणेकर आणि वृक्षप्रेमींनी आधुनिक ‘चिपको आंदोलन’ सुरू केले आहे. या मार्गावरील २० जुने वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच वृक्ष आधीच तोडण्यात आले आहेत. मात्र किमान उर्वरीत वृक्षांची कत्तल थांबावी, या हेतूने जागरुक पुणेकर वृक्षप्रेमींनी वृक्षांच्या बुंध्याजवळ खडा पहारा सुरू केला आहे. शुक्रवारची संपूर्ण रात्र वृक्षप्रेमींनी झाडाशेजारीच जागून काढली. शनिवारी दुपारी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी वृक्षप्रेमींची भेट घेतली. ‘वृक्षतोड न करताही रस्तारुंदी आणि विकास शक्य आहे. मी आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिणार आहे,’ असे शिरोळे म्हणाले. महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे ही वृक्षतोड सुरू आहे. मात्र वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त झालेली असताना वृक्षतोडीची परवानगी कुणी दिली, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.  
 
वृक्षप्रेमी विनोद जैन म्हणाले, ‘आयुक्तांनी चुकीच्या माहितीच्या आधारे वृक्षतोड चालवली आहे. आयुक्त हटाव, पुणे बचाव’ मोहीम सुरू करणार आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनीही ‘मला यासंदर्भात माहिती नाही,’ असे म्हणत हात झटकले असले तरी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या वृक्षप्रेमींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मात्र त्यांनी दिले असल्याचे समजते.
 
पर्यावरणप्रेमी झाडे वाचविण्यासाठी झाडाजवळ झाेपले 
पुणे  - रस्ते विकासाच्या नावाखाली परवानगी नसतानाही पुणे विद्यापीठ ते अाैंध रस्त्यावरील २० माेठी झाडे उद्यानविभाग ताेडत असल्याने, पर्यावरणप्रेमींनी झाडे वाचविण्यासाठी रात्री संबंधित झाडांजवळ झाेपण्याचे अनाेखे अांदाेलन केले. शनिवारी खासदार अनिल शिराेळे यांनी सदर पर्यावणप्रेमींची भेट घेऊन याबाबत अापण अायुक्तांना पत्र लिहुन दखल घेण्यास सांगणार असल्याचे स्पष्ट केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...