आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 ते 72 तासांत मान्सून केरळमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पावसाचे सुखद वर्तमान असतानाच नैर्ऋत्य मोसमी पावसाने केरळच्या दिशेने आगेकूच केल्याची आनंदवार्ता हवामान खात्याने दिली आहे. बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे 
मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल बनत आहे.
 
गेले दोन दिवस मान्सून उपसागरातील केरोमिन परिसरात थबकला होता. मात्र, वाऱ्याच्या अनुकूलतेमुळे पावसाचा प्रवास सुरळीत होण्यास अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.    आयएमडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिमी वाऱ्यांच्या बळकटीमुळे आणि द्रोणीय क्षेत्र (शेअर झोन) उत्तरेकडे सरकल्याने खोळंबलेला मान्सून पुढे सरकला आहे. रविवारी सायंकाळी मान्सूनने संपूर्ण मालदीव बेटे व्यापली अाहेत.
बातम्या आणखी आहेत...