आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाईच्या विरहाने पुण्यात तरुणीची अात्महत्या, मध्य प्रदेशातील माेनिकाच्या चिठ्ठीत मित्रावरही अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 पुणे- आईच्या अकाली निधनाचा विरह सहन न झाल्याने मध्य प्रदेशच्या एका तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात मंगळवारी रात्री उघडकीस अाली. मोनिका रामदास शर्मा (२८, रा. बावधन खुर्द, पुणे) असे मृत तरुणीचे नाव आहे.  
 
याप्रकरणी हिंजवडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. माेनिका ही मूळ मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असून ती गेल्या तीन वर्षांपासून पुण्यातील बावधन परिसरातील बाेरिंग फार्मा या कंपनीत काही वर्षांपासून सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नाेकरी करत हाेती. 
 
मंगळवारी माेनिका कंपनीत न आल्याने तिचा मित्र रात्री साडेअाठ वाजता तिच्या घरी गेला. त्यावेळी तिने दरवाजा न उघडल्याने मित्राने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिचा पंख्याला गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. दरम्यान, आईच्या अकाली निधनाने नैराश्य आल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
 
बाहुलीसारखा वापर
माेनिका शर्माचे कुटुंबीय पुण्यात दाखल झाले असून त्यांच्याकडे तिचा मृतदेह साेपवला अाहे. माेनिकाने अात्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले की, ‘माझी अाई, वडील, भाऊ, बहीण यांच्याकडून मला खूप प्रेम मिळाले अाहे. आईच्या निधनामुळे मी अात्महत्या करत अाहे. माझ्या अाॅफिसमध्ये रणजित नावाचा मित्र असून त्याने माझा बाहुलीसारखा वापर केला अाहे. मात्र, माझी कुणाविराेधातही तक्रार नसून माझ्या अात्महत्येस कुणाला दाेषी धरू नये.’
बातम्या आणखी आहेत...