आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या लग्नाचं गुपीत फुटू नये म्हणून केली मेहुणीची हत्या, पुण्यातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एका व्यक्तीने दुसऱ्या लग्नाचे गुपित फुटण्याच्या भितीने मेहुणीती निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. अश्विनी परदेशी (25) असे मृत तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. सुमारे महिनाभरापूर्वी घडलेली ही घटना बुधवारी उघडकीस आली. 

आरोपी गोविंद ताकभाते याने एक लग्न झालेले असताना दुसरे लग्न केले होते. मात्र त्याने पहिल्या पत्नीला याबाबत काहीही थांगपत्ता लागू दिला नाही. मात्र गोविंदच्या पत्नीची बहिण म्हणजेच मृत अश्विनीला याबाबत माहिती मिळाली होती. ती या प्रकरणी गोविंदला सारख्या धमक्या देत होती. त्यामुळे तिने बायकोला सांगू नये या भितीपोटी आरोपीने अश्विनीला संपवण्याचा निर्णय घेतला. 

आरोपी गोविंदने अश्विनीचे अपहरण केले आणि तिला बार्शी रस्त्यावरील एका सामसूम ठिकाणी नेले. त्याठिकाणी त्याने तिची हत्या केली. त्यानंतर याबाबत कोणाला काही समजू नये म्हणून, त्याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाला जवळपास महिनाभराहून अधिक काळ उलटून गेला होता. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...