पुणे - दहावर्षीय नातवाची गळा दाबून हत्या केल्यानंतर आजोबाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरात शनिवारी घडली. जिनय शहा (१०) व सुधीर दगडूमल शहा (६५) अशी मृतांची नावे आहेत.
शहा कुटुंबीय कोंढव्यातील जैन सोसायटीत राहतात. शुक्रवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर जिनयचे आई-वडील बेडरूममध्ये झोपले, तर जिनय आजोबांसोबत झोपला. पहाटे सुधीर यांनी आधी जिनयचा गळा आवळला. त्यानंतर स्वतः सातव्या मजल्यावरून उडी मारली. दरम्यान, शहा कुटुंबीयांच्या मालकीची शिरूरमध्ये मोठी जमीन आहे. त्यासंबंधी न्यायालयात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. यातून आलेल्या नैराश्यातून शहा यांनी हे कृत्य केले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, नातवाशिवाय राहू शकत नाही म्हणून त्याला घेऊन चाललोय...