आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भागवतांना गाेवणाऱ्या शरद पवारांना मदत का? खासदार नाना पटोले यांचा प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘ज्या राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवारांनी भगव्या आतंकवादाचा मुद्दा काढून सरसंघचालक मोहन भागवत यांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवण्याचा प्रयत्न केला, अशांनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी मदत कशी करतात?’ असा खळबळजनक प्रश्न भाजपचे खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी उपस्थित केला. सरसंघचालकांवर हात टाकण्याचा प्रयत्न जे करतात त्यांना फडणवीस- गडकरी मदत का करतात, याचे उत्तर मला हवे असल्याचे ते म्हणाले.  


 पुण्यातील वसंतदादा  सेवा संस्थेच्या वतीने आयोजित ‘तीन वर्षांतील फसलेले अर्थकारण’ या विषयावर देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी खासदार पटोले बोलत होते.  


 “मालेगाव बॉम्बस्फोटात सुधाकर चतुर्वेदी हा संघाचा कार्यकर्ता सहभागी होता. त्याने पत्रकार परिषद घेऊन या बॉम्बस्फोटात मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे आताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. याच चतुर्वेदीने शरद पवारांचेही नाव घेतले. ‘हिंदू आतंकवाद’ हा पवारांनी निर्माण केलेला शब्द असल्याचा आरोप त्याने केला. त्याच ‘राष्ट्रवादी’चे प्रफुल्ल पटेल यांनी २४ तासांच्या आत भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. मुख्यमंत्री याच ‘राष्ट्रवादी’ला दिलदार शत्रू म्हणतात. सरकारला वाचवणारे ‘अदृश्य हात’ म्हणतात. खरे तर सरसंघचालकांचे पद असे आहे की पंडित नेहरूसुद्धा त्याचा सन्मान ठेवायचे. असे असताना सरसंघचालकांना गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’चे कौतुक कसे केले जाते?’ असा प्रश्न पटाेले यांनी केला.  

बातम्या आणखी आहेत...